अफगाणिस्तान सरकारचा पाडाव करत तालिबान्यांनी अफगाणिस्तान बळकावल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यास क्रिकेटही अपवाद नाही. क्रिकेट चाहत्यांना भीती वाटतेय की, आयपीएलमध्ये अफगाणिस्तानच्या खेळाडूंचे काय होईल? प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे की, अफगाण क्रिकेटचे भवितव्य काय असेल? सध्या संपूर्ण अफगाणिस्तान देश दहशतवाद्यांच्या संकटातून जात आहे. गुरुवारी (१९ ऑगस्ट) तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तान पूर्णपणे काबीज केले आहे.
अशा परिस्थितीतही अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशीद खान याने गुरुवारी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर करून एक विशेष संदेश लिहिला आहे. या पोस्टमध्ये राशीदने इतर देशांतील लोकांना आपल्या देशातील परिस्थितीकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे.
अफगाणिस्तानचा क्रिकेटर राशिद खानने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही जुनी छायाचित्रे शेअर करून अफगाणिस्तानच्या लोकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राशीदने त्याच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. “आज आपण आपल्या राष्ट्रासाठी थोडा वेळ काढुया आणि देशासाठीचा त्याग कधीही विसरू नका. आम्ही शांततापूर्ण, विकसित आणि संयुक्त राष्ट्राची अपेक्षा करतो आणि प्रार्थना करतो.”
राशीदने केलेल्या ट्विटवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत त्याचे मनोधैर्य वाढवले आहे.
Today let us take some time to value our nation and never forget the sacrifices. We hope and pray for the peaceful , developed and United nation INSHALLAH #happyindependenceday 🇦🇫🇦🇫 pic.twitter.com/ZbDpFS4e20
— Rashid Khan (@rashidkhan_19) August 19, 2021
अलीकडेच इंग्लंडचे माजी खेळाडू केविन पीटरसन यांनी राशिद खानची परिस्थिती सांगताना म्हटले की, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खान आपल्या देशातील परिस्थितीमुळे चिंतेत आहे. कारण तो आपल्या कुटुंबाला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्यास यश येत नाहीय. राशीद सध्या यूकेमध्ये सुरू झालेल्या ‘द हंड्रेड क्रिकेट लीग’ स्पर्धेत ट्रेंट रॉकेट्सकडून खेळतो आहे.
पीटरसन पुढे म्हणाला, “अफगाणिस्तानमध्ये बऱ्याच गोष्टी घडत आहेत. आम्ही याबद्दल बरीच चर्चा केली आहे आणि राशीद खूप काळजीत आहे. तो आपल्या कुटुंबाला अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यास असमर्थ आहे. त्याच्यासाठी ही वेळ खूप कठीण आहे. राशीदच्या इतक्या दबावाखाली राहून देखील तो ‘द हंड्रेड’ स्पर्धेत खूप चांगलं प्रदर्शन करत आहे. हे खूप प्रेरणादायी आहे”.
महत्त्वाच्या बातम्या-
युएईत घोंगावणार मुंबईकरांचे वादळ, अर्जुनसह ‘हे’ खेळाडू हॉटेलच्या रूममध्ये करतायत कसून सराव
AK-47 हाती घेऊन अफगाणी क्रिकेट बोर्डाच्या ऑफिसमध्ये घुसले तालिबानी, माजी क्रिकेटरही दिसला सोबत