भारताचा कुस्तीपटू रवि दहिया (Ravi Dhaiya) याने अलमाटी येथे चालू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये ५७ किलो वजनगटातील आपले जेतेपद वाचवले आहे. त्याने अंतिम सामन्यात ईरानच्या अलीरेजा नोसरातोलाह सरलॉक याला ९-४ ने पराभूत करत आपल्या वजनगटातील सुवर्णपदक जिंकले आहे.
दुसरीकडे भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकल्याने त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला विजेता घोषित करण्यात आले आहे. यामुळे बजरंगला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले आहे.
जवळपास एका वर्षानंतर पुनरागमन करणाऱ्या दहियाने पूर्ण आशियाई कुस्ती चॅम्पियनशीपमध्ये दमदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्या फेरीत उज्बेकिस्तानच्या नोदिरजोन सफरोवला ९-२ ने पराभूत केले. त्यानंतर फलस्तीनच्या अली एम एम अबुयमैला पराभूत करत अंतिम फेरी गाठली.
Many congratulations to #TOPSAthlete Ravi Dahiya 🤼♂️ who retains his title in Men’s 57 kg at the Asian Wrestling Championships after beating Iran’s Alireza Sarlak 9-4.#Wrestling pic.twitter.com/CDJtMpXYXi
— SAI Media (@Media_SAI) April 17, 2021
#TOPSAthlete @BajrangPunia finishes his campaign at the Asian Wrestling Championships with a 🥈 in the Men’s 65 kg. He did not play the final against Japan’s Takuto Otuguro.#wrestling pic.twitter.com/nzgOXJa8KU
— SAI Media (@Media_SAI) April 17, 2021
बजरंगने सुरुवातीच्या सामन्यात सहज विजय संपादन केला. ६५ किलो वजनगटातील सुरुवातीच्या सामन्यात त्याने कोरियाच्या योंगसियोग जियोंगवर सोपा विजय मिळवला. त्यानंतर मंगोलियाच्या बिलगुन सरमानदाखला चितपट करत त्यानेही अंतिम फेरीत धडक मारली होती. यावेळी त्याचा सामना जपानचा ताकुतो ओटोगुरोविरुद्ध होणार होता. परंतु दुखापतीमुळे त्याला अंतिम सामना न खेळताच परतावे लागले.
महत्त्वाच्या बातम्या-
बजरंग पुनिया घेतोय सोशल मीडियापासून ब्रेक, ‘हे’ आहे कारण
दंगल गर्लच्या बहिणीची आत्महत्या! ‘हे’ कारण आले समोर
महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा: हर्षद कोकाटे, पृथ्वीराज मोहोळ यांना विजेतेपद