भारतीय स्पीडगन उमरान मलिकला राष्ट्रीय संघात स्थान मिळाल्यानंतर अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. त्याला अंतिम अकरामध्ये खेळवावे की नाही यावर अनेक माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. त्यातच भारतीय पुरूष क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी उमरानबाबत आश्चर्यकारक विधान केले आहे.
उमरानला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी संघात जागा मिळाली आहे. या मालिकेत जे खेळाडू उत्तम कामगिरी करतील त्यांना ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकात जागा मिळू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
‘उमरानला आताच मोठ्या स्पर्धांमध्ये संधी देण्याची घाई करण्याची आवश्यकता नाही. आधी त्याचा चांगला जम बसू द्या,’ असे मत शास्त्रींनी मांडले आहे.
जम्मू-काश्मिरच्या या गोलंदाजाने २०२२च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळला. यावेळी त्याने ताशी १५५ किमी पेक्षा अधिक वेगाने चेंडू टाकून सगळ्यांना हैरान केले होते. त्याने या हंगामात १४ सामन्यात २२ विकेट्स घेतल्या होत्या. याच कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.
शास्त्री यांनी इएसपीएनला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, “सध्या उमरानला संघामध्ये नेट बॉलिंगसाठी ठेवा पण लगेचच टी२०मध्ये खेळवू नका. आधी त्याचा पांढऱ्या आणि लाल चेंडूसोबत कसून सराव करून घ्या. त्याच्या गोलंदाजीमध्ये अजून सुधार होऊ द्या.”
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनीही उमरानच्या गोलंदाजीचे कौतुक केले आहे. ‘संघात युवा खेळाडू असणे ही चांगली बाब आहे. पण सगळ्यानाच अंतिम अकरामध्ये स्थान देणे शक्य नाही,’ असे स्पष्टीकरण द्रविड यांनी दिले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात उमरानला बाकावर बसावे लागले होते. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारताला ७ विकेट्सने पराभूत व्हावे लागले होते.
भारतीय संघ केएल राहुल (KL Rahul) दुखापतग्रस्त असल्याने यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखाली खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (१२ जून) बाराबाती स्टेडियम, कटक येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिकेत कसा परत येतो याकडे लक्ष असणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
निवृत्तीच्या ३ वर्षांनंतर युवराज भावुक, इंस्टाग्राम वर शेअर केला व्हिडिओ
उमरान मलिकला संघात न घेतल्याने फॅन भडकले टीम इंडियावर; प्रतिक्रीयांचा झाला भडिमार
दुसऱ्या टी२० सामन्यांत भारतीय संघात होणार दोन मोठे बदल, ‘या’ खेळाडूंची होणार हकालपट्टी?