भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा यावेळी संघासोबत इंग्लंडमध्ये आहे. भारतीय संघ याच महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्युझीलंड विरुद्ध खेळणार आहे. यादरमान जडेजाने आपली लेक निध्यानाचा चौथा वाढदिवस साजरा केला. या खास दिवशी त्याने आपली पत्नी रिवा सोलंकीसोबत एक चांगलं काम देखील केले आहे.
आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या प्रसंगी जडेजा आणि त्याची पत्नी रिवाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पाच कुटुंबाचे बचत खाते उघडले आहे. रिवाने पोस्टात हे बचत खाते उघडले. त्या खात्यांमध्ये प्रत्येकी 10 हजार रूपये देखील त्यांनी जमा केले आहे, आणि ही सर्व खाती घरातल्या मुलींच्या नावाने उघडण्यात आली आहे आणि सूत्रानुसार जडेजा आणि त्याची पत्नी पुढे देखील या मुलींना मदत करणार आहे.
साल 2016 मध्ये केला होता विवाह
बराच काळ एकमेकांसोबत घालवल्यानंतर रवींद्र जडेजा आणि रिवाने 5 फेब्रुवारी 2016 ला साखरपुडा केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी एप्रिलच्या 17 तारखेला ते दोघे विवाहबंधनात अडकले. दोघांना एक मुलगी देखील असून, तिचं नाव निध्याना आहे. रिवा नेहमी मैदानावर उपस्थित राहून जडेजाच मनोबल वाढवत असते.
भारतीय जनता पक्षात केला पक्षप्रवेश
जडेजाची पत्नी रिवाने काही दिवसांपासून राजनीतीमध्ये कारकीर्द करायचे ठरवले असून त्यांनी नुकतेच बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आपली अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केली असून रिवाचे पिता एक प्रसिद्ध व्यापारी आहेत.
रवींद्र जडेजाची कारकीर्द
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा गेल्या १२ वर्षांपासून भारतीय संघाकडून खेळतो आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात त्याने सातत्याने आपले योगदान दिले आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने ५१ सामन्यात १९५४ धावा काढल्या असून २२० बळी घेतले आहेत. तर १६८ वनडे सामन्यात २४११ धावा काढल्या असून १८८ बळी घेतले आहेत. टी२० क्रिकेटमध्ये देखील त्याने शानदार प्रदर्शन केले असून ५० टी२० सामन्यात त्याने ३९ बळी घेतले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
विराट-रोहित नाही, तर कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत या खेळाडूंची भूमिका निर्णायक
इंग्लिश क्रिकेटमध्ये वादळ! आणखी एका आंतरराष्ट्रीय खेळाडूची होणार वर्णद्वेषी टिप्पणीसाठी चौकशी
चहलने शेअर केला पत्नीसोबत व्यायाम करतानाचा व्हिडिओ, चाहत्यांनी दिले मजेशीर सल्ले