सध्या रायपूर येथे निवृत्त झालेल्या दिग्गज खेळाडूंची रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळली जात आहे. सर्व देशांचे संघ स्पर्धेत सहभागी झाले असताना, पाकिस्तान संघ मात्र या स्पर्धेत खेळत नाही. त्याचवेळी, पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे नाव रावळपिंडी येथील एका क्रिकेट स्टेडियमला देऊन त्याचा सन्मान केला गेला आहे. शोएबने याबाबतचे ट्विट करत, आभार व्यक्त केले.
या प्रसिद्ध मैदानाला दिले अख्तरचे नाव
पाकिस्तानच्या सर्वकालीन महान वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेला शोएब अख्तर याचे नाव प्रसिद्ध मैदानावर देण्यात आले. रावळपिंडी येथील खान रिसर्च लॅबोरेटरीजच्या केआरएल स्टेडियमचे नामकरण आता ‘शोएब अख्तर क्रिकेट स्टेडियम’ असे करण्यात आले आहे. या मैदानाचा वापर सर्व खेळांसाठी केला जातो. या मैदानाची प्रेक्षक क्षमता ८००० इतकी आहे.
अख्तरने मानले आभार
केआरएल स्टेडियमचे नामकरण आपल्या नावे केल्यानंतर शोएबने ट्विटरवरून आभार मानले. त्याने ट्विट करत लिहिले, ‘माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. माझ्याकडे सध्या शब्द नाहीत. इतक्या वर्षात जे प्रेम आणि सन्मान मला मिळाला आहे, ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.’
Humbled and honoured to share that the historic KRL Stadium in Rawalpindi has been renamed as Shoaib Akhtar Stadium. I am rarely ever lost for words but today I am! I truly have no words to thank everyone for the love & respect i have received over the years.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) March 13, 2021
अख्तरने आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये लिहिले, ‘मी पुर्ण इमानदारीने आणि निष्ठेने देशाची इतकी वर्ष सेवा करत, देशाचा झेंडा उंचावण्याचा प्रयत्न केला. मी रोज अभिमानाने छातीवर पाकिस्तानचा स्टार लावू शकतो. धन्यवाद’.
अख्तरने या ट्विटसोबत दोन छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ज्यामध्ये एक स्टेडियमचे आहे तर, दुसरे त्या स्टेडियम बाहेरील कोनशिलेचे आहे.
https://twitter.com/shoaib100mph/status/1370675554496708610
पाकिस्तानसाठी राहिली अख्तरची मोठी कारकीर्द
जगातील सर्वात वेगवान गोलंदाज असे बिरुद मिरवणाऱ्या शोएबने पाकिस्तानसाठी ४६ कसोटी, १६३ वनडे व १५ टी२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे १७८, २४७ व १९ बळी मिळवले होते. २०११मध्ये निवृत्त झाल्यानंतर तो समालोचक म्हणून काम करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
आता तरी द्या तो चेंडू! पहिल्या टी२० सामन्यादरम्यान हार्दिक पंड्या वैतागला प्रेक्षकांवर, पाहा व्हिडिओ
Video : क्रिकेटच्या मैदानात पुन्हा युवराजचे वादळ; सलग चार षटकार ठोकत केले चाहत्यांचे मनोरंजन