भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंत याच्याबाबत मोठी अपडेट पुढे येत आहे. त्याचा 30 डिसेंबरला पहाटे मोठा कार अपघात झाला होता. त्याचा हा अपघात दिल्ली-डेहराडून महामार्गावर झाला होता. तेव्हा त्याला डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये भरती केले होते आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला पाठवले जाण्याची शक्यता आहे. ही माहिती दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे संचालक श्याम शर्मा यांनी एएनआयला दिली.
रिषभ पंत (Rishabh Pant) याला बुधवारी (4 जानेवारी) मुंबईमध्ये पाठवले जाणार आहे, असे शर्मा म्हणाले. तसेच आवश्यकता असल्यास त्याला अमेरिका किंवा ब्रिटनला नेले जाऊ शकते. अपघात झाल्यानंतर त्याच्यावर डेहराडूनमधील मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
पंत अपघातावेळी एकटाच गाडीमध्ये होता आणि खड्डा चुकवण्याच्या नादात त्याचा हा भीषण अपघात झाला. तेव्हा त्याची गाडी डिवायडरला धडकली आणि गाडीने पेट घेतला. तो खिडकीची काच तोडून बाहेर निघाला तेव्हा तेथिल उपस्थित लोकांनी त्याच्यासाठी ऍम्ब्युलन्स बोलावली. या अपघातात त्याची गाडी पूर्णपणे जळाली असून तो अपघात किती मोठा होता, हे कळते. यामध्ये त्याच्या डोके, पाठ आणि पायांना गंभीर दुखापत झाली. त्याच्या या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.
Cricketer Rishabh pant will be shifted to Mumbai today for further treatment: Shyam Sharma, Director DDCA to ANI (in file pic)
Rishabh Pant is currently undergoing treatment at a private hospital in Dehradun following a car accident on December 30th pic.twitter.com/d2TpTYlou8
— ANI (@ANI) January 4, 2023
“रिषभला त्याच्या लिगामेंट (ligament) दुखापतींच्या उपचारांसाठी मुंबईला हलवण्यात येईल. तो बीसीसीआयच्या प्रसिद्ध क्रीडा ऑर्थोपेडिक डॉ. दिनशॉ पार्डीवाला यांच्या देखरेखीखाली असेल. तसेच गरज भासल्यास त्याला सर्जरीसाठी अमेरिका किंवा ब्रिटनमध्ये पाठवले जाऊ शकते,” असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले.
शर्मा यांनी पंत उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे, असे आधीच सांगितले होते. “पंत उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहे. त्याची स्थिती स्थिर असून त्याला आयसीयूमधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले आहे,” असे शर्मा म्हणाले. पंतचा अपघात झाल्यावर त्याच्या अनेक संघसहकाऱ्यांनी, इतर संघाच्या खेळाडूंनी आणि चाहत्यांनी तो लवकर बरा व्हावा ही अशी इच्छा व्यक्त केली आहे.
पंतच्या दुखापतींवरुन तो किती लवकर बरा होईल, हे सांगणे कठीण आहे. यामुळे तो घरच्या मैदानावर होणाऱ्या आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकणार आहे.
(Rishabh Pant’s further treatment in Mumbai DDCA director Shyam Sharma)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSL: विकेट घेण्यात हार्दिक अपयशी, मात्र नोंदवला अनोखा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय कॅप्टन
AUSvSA: सामन्यादरम्यान मार्नस लॅब्यूशेनचा सिगारेट पिण्याचा इशारा! कारण चकित करणारे, व्हिडिओ व्हायरल