दुलीप ट्रॉफी 2024 ची दुसरी फेरी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीत भारत ‘अ’ आणि भारत ‘ड’ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात भारत ‘अ’ संघानं पुन्हा एकदा खराब सुरुवात केली. संघानं 100 धावांच्या आत 5 विकेट गमावल्या आहेत, ज्यात कर्णधार मयंक अग्रवालसह इतर मोठ्या फलंदाजांचा समावेश आहे.
दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीत भारत ‘अ’ संघाला भारत ‘ब’ कडून दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्याचबरोबर पहिल्या फेरीत संघाचा कर्णधार असलेला शुबमन गिलही आता संघाचा भाग नाही. गिलच्या अनुपस्थितीत मयंक अग्रवालकडे भारत ‘अ’ संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलंय.
पहिल्या सामन्यात तिलक वर्मा प्लेइंग 11 चा भाग नव्हता. दुसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली. मात्र तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलकनं 33 चेंडूंचा सामना करत केवळ 10 धावा केल्या. तिलकला श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संधी मिळणार होती, परंतु तो जायबंदी झाला. यानंतर तो दुलीप ट्रॉफीमध्ये परतला आहे.
भारत ‘अ’ संघाकडून खेळताना जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणाऱ्या रियाग परागनं पुन्हा एकदा आपल्या जुन्या चुकीची पुनरावृत्ती केली. तो 29 चेंडूत 37 धावांची खेळी करून बाद झाला. दुलीप ट्रॉफी सामन्यात टी20 शैलीत फलंदाजी करणं त्याला महागात पडतंय. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असूनही तो पुन्हा एकदा टी20 स्टाईलमध्ये फलंदाजी करताना आऊट झाला.
दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगनं रियानला आपला शिकार बनवलं. अर्शदीपनं ऑफ स्टंपच्या बाहेर एक वेगवान फुल लेन्थ बॉल टाकला, ज्यावर ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न करताना रियाननं त्याची विकेट गमावली. याआधी पहिल्या सामन्यातही तो वेगवान धावा गोळा करण्याच्या प्रयत्नात बाद झाला होता.
हेही वाचा –
भारत-बांगलादेश कसोटी मालिकेपूर्वी चेंडूवरून गोंधळ…एसजी आणि कुकाबुरा बॉलमध्ये फरक काय?
आयपीएल 2025 चा मेगा लिलाव कधी अन् कुठे होणार? संभाव्य तारीख, ठिकाण आणि रिटेन होणाऱ्या खेळाडूंची नावं जाणून घ्या
हत्येचा आरोपी शाकिब भारतात खेळण्यासाठी येणार, कसोटी मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ जाहीर