भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी२० च्या सामन्यात दक्षिण आफ्रिका लिजेंड्सविरूद्ध इंडिया लिजेंड्सकडून खेळताना तुफानी खेळी खेळली. युवराज सिंगने या सामन्यात केवळ २१ चेंडूत ६ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने २२ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. युवराज सिंगच्या या वेगवान खेळीच्या बळावर इंडिया लिजेंड्सने २० षटकांत ३ गडी गमावून २०४ धावांची मोठी धावसंख्या उभारली.
युवराजने ठोकले सलग चार षटकार
युवराजने सर्व चाहत्यांना आपले ‘सिक्सर किंग’ हे रूप पुन्हा एकदा दाखवून आनंद साजरा करण्याची संधी दिली. त्याने भारतीय डावाचा अठराव्या षटकात डी ब्रुयनच्या षटकातील दुसर्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूत सलग षटकार ठोकले. युवराजने ४६ धावांवर फलंदाजी करत असताना गार्नेट क्रूगरच्या चेंडूवर षटकार मारत अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान युवराज सिंगचा स्ट्राईक रेट २३६.३६ होता.
Yuvraj is back 6,6,6,6 in a over#YuvrajSingh #RoadSafetyWorldSeries2021 pic.twitter.com/RDmkGte3s8
— Rohith (@Rohith_Crico) March 13, 2021
Yuvi 4 sixes in 4 balls #YuvrajSingh #Yuvraj #yuvraj #INDLvsSAL pic.twitter.com/B5ekIYDFVM
— X (@Shubham_thakran) March 13, 2021
https://twitter.com/YuviReignsGirl/status/1370755870544437250
Yuvraj Singh was 15*(12) then he smashed 0,6,6,6,6,0,6,1,6 and completed fifty from just 21 balls including 2 fours and 6 sixes – King of sixes has landed.
#RoadSafetyWorldSeries2021#yuvi#SachinTendulkar #singhisking #jatt #IndiaLegends #yuvrajsingh pic.twitter.com/oSLaiKdU4T
— Anuj choudhary (@madhyananuj) March 13, 2021
https://twitter.com/BhavsarCharita/status/1370768761184251910
भारताने गाठला २०० धावांचा पल्ला
या सामन्यात युवराज सिंगशिवाय कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज सचिन तेंडुलकरनेही अतिशय आकर्षक खेळी खेळली. त्याने ३७ चेंडूंत एक षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. या सामन्यात सेहवाग लवकर बाद झाला. एस बद्रीनाथने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ४२ धावांची खेळी केली. युसुफ पठाणने १० चेंडूंत २३ धावांचे योगदान दिले तर, मनप्रीत गोनीने एका षटकाराच्या मदतीने नाबाद १६ धावा काढल्या. युवराज सिंग आणि मनप्रीत गोनी यांनी चौथ्या गड्यासाठी ६३ धावांची अर्धशतकी भागीदारी केली.
सुनील गावसकर यांची उपस्थिती
सामन्याच्या सुरुवातीला भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांनी मैदानावर हजेरी लावली. इंडिया लिजेंड्स संघाकडून त्यांना सर्व खेळाडूंची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली गेली. सुनील गावसकर हे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे ब्रँड अँबेसिडर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कुछ नही बदला यार! सचिनच्या ‘त्या’ स्ट्रेट ड्राईव्हने चाहते हरवले आठवणीत, पाहा व्हिडिओ
लॉकडाऊनमध्ये ‘या’ गोष्टी केल्याने सुर्यकुमार राहिला फिट; तीन महिन्यात केले १२ किलो वजन कमी