अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ यावर्षी आय़पीएलमध्ये सपशेल फ्लॉप ठरला. त्यामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामात सर्वात पहिल्यांदा सीएसके प्ले ऑफच्या शर्यतीतुन बाहेर झाला. मात्र जाता जाता त्यांनी हंगामातील त्यांच्या शेवटच्या ३ सामन्यात दणदणीत विजय मिळवला. या विजयात मराठमोठा खेळाडू ऋतुराज गायकवाडने मोलाचे योगदान दिले. त्यामुळे संघ कर्णधार एमएस धोनीही त्याची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला थांबवु शकला नाही. पण ऋतुराजच्या या यशामागे त्याचे प्रशिक्षक संदीप चव्हाण यांचा मोठा हात आहे.
प्रशिक्षकाच्या सल्ल्याने बदलले गायकवाडचे जीवन
ऋतुराजविषयी बोलताना प्रशिक्षक संदीप चव्हाण म्हणाले की, “ऋतुराज वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये असताना माझा विद्यार्थी होता. त्यावेळी ऋतुराज ज्युनिअर पातळीवरील महाराष्ट्र क्रिकेट संघाकडून मधल्या फळीत फलंदाजी करत असायचा. जवळपास ७ वर्षांपुर्वी मी त्याच्यातील प्रतिभेला पाहता त्याला क्लब क्रिकेटमध्ये सलामीला फलंदाजी करण्याचा सल्ला दिला होता. तसेच त्याला म्हणालो होतो की, माझ्या या सल्ल्याचा तुला भविष्यात नक्कीच फायदा होईल.”
“सुरुवातीला सलामीला फलंदाजी करताना त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पण पुढे त्याच्या फलंदाजीत सुधारणा झाल्या. त्याने १६व्या वर्षी वरिष्ठ पातळीवरील मांडके ट्रॉफी या स्थानिक स्पर्धेत सलामीला फलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने १०० धावा आणि ९० धावा अशा अफलातून खेळी केल्या होत्या,” असे पुढे बोलताना चव्हाण यांनी सांगितले.
ऋतुराजची क्रिकेट कारकिर्द
सीएसकेचा २३ वर्षीय धुरंधर ऋतुराजला आयपीएल २०२०च्या हंगामाची सुरुवात होण्यापुर्वी कोरोना झाला होता. त्यामुळे त्याला हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळता आले नाहीत. अखेर २२ सप्टेंबर रोजी त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सीएसकेच्या या हंगामातील शेवटच्या ३ सामन्यात त्याने सलग ३ अर्धशतक लगावण्याचा पराक्रम केला. यासह ६ सामन्यात त्याच्या खात्यात २०४ धावांची नोंद झाली आहे.
तसेच त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील आकडेवारीही प्रशंसनीय आहे. आतापर्यंत त्याने २१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले असून १३४९ धावा केल्या आहेत. तर ५४ अ दर्जाच्या सामन्यात २४९९ धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त देशांतर्गत टी२० क्रिकेटमध्ये ३४ सामन्यात त्याने १०४७ धावांची नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नरेन, ऋतुराज यांनी केली अनोखी कामगिरी; पाहा चेन्नई-कोलकाता सामन्यानंतरची खास आकडेवारी
ट्रेंडिंग लेख-
‘हे’ ३ संघ कधीही राहिले नाही गुणतालिकेत शेवटच्या स्थानी, तर दिल्ली संघ मात्र…
IPL 2020 : कोलकाताच्या ‘या’ पाच खेळाडूंपुढे राजस्थानने टेकले गुडघे
वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?