गत-उपविजेत्या न्यूझीलंड संघाविरुद्ध भारतीय संघ धरमशाला येथे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 21व्या सामन्यात भिडत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तसेच, न्यूझीलंडला फलंदाजीसाठी पाचारण केले आहे. अशातच या सामन्यादरम्यान भारतीय संघाचे माजी फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी विश्वचषक 2019 स्पर्धेच्या उपांत्य सामन्याविषयी मोठा खुलासा केला आहे.
काय म्हणाले बांगर?
इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या विश्वचषक 2019 (World Cup 2019) स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात खेळला गेला होता. या सामन्यात भारतीय संघाला 18 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्याविषयी बोलताना संजय बांगर (Sanjay Bangar) म्हणाले की, “भारत शानदार क्रिकेट खेळत असल्यामुळे सर्वच खेळाडूंसाठी तो हृदयद्रावक क्षण होता. आपण साखळी फेरीतील 7 सामने जिंकलो होतो आणि अशाप्रकारे स्पर्धेबाहेर पडणे चांगले नव्हते.”
भारताच्या पराभवानंतर खेळाडूंची स्थिती खूपच निराशाजनक होती. अनेक खेळाडू ढसाढसा रडत होते. याविषयी बोलताना बांगर म्हणाले की, “खेळाडू लहान मुलांसारखे रडले. एमएस धोनी लहान मुलासारखा रडत होता. हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत यांच्या डोळ्यातही अश्रू होते. असे किस्से ड्रेसिंग रूममध्येच राहतात.”
Sanjay Bangar said, "players including MS Dhoni, Rishabh Pant and Hardik Pandya couldn't stop their tears and cried bitterly in the dressing room after losing the 2019 World Cup Semis". pic.twitter.com/zn18v3JKAA
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 22, 2023
जडेजा अन् धोनीने केलेली कमाल फलंदाजी
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात भारताकडून दोनच खेळाडू फलंदाजीत चमकले होते. त्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांचा समावेश होता. जडेजाने या सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने 84 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. यामध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. तसेच, एमएस धोनी यानेही 72 चेंडूत 50 धावांची दुसरी मोठी खेळी केली होती. त्याने एक षटकार आणि एक चौकार मारलेला.
विश्वचषक 2023मध्ये करणार का पराभूत?
विश्वचषकाचा इतिहास पाहिला, तर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 8 वेळा भिडला आहे. मात्र, त्यात न्यूझीलंड 5 वेळा, तर भारत 3 वेळा विजयी झाला आहे. अशात विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत हे दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने-सामने आहेत. या सामन्यात कोणता संघ विजय मिळवतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Sanjay Bangar opened up on the team’s elimination from the World Cup 2019 said this read here)
हेही वाचा-
वर्ल्डकपमध्ये अंडररेटेड समजलेल्या शमीने दाखवला इंगा, पहिल्याच बॉलवर उडवला फलंदाजाचा त्रिफळा- Video
क्या बात है! अवघ्या 9 धावांवर न्यूझीलंडला बसला पहिला धक्का, सिराजने ‘असा’ काढला कॉनवेचा काटा