पुणे, 30 जानेवारी 2024: 41व्या वरिष्ठ व 25व्या खुल्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेत पुरुष गटात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाने, तर महिला गटात मध्यप्रदेश संघाने आगेकूच केली.
कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग(सी एम ई) कॅम्पस येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंगल स्कल्स प्रकारात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाने उपांत्यपूर्व फेरीत तर, डबल स्कल्स, कॉक्सलेक्स प्रकार, क्वाड्रापल स्कल्स या तीन प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
२००मीटर शर्यतीत सलमान खानने ७मिनिटे ३१.२सेकंद वेळ नोंदवत गतवर्षीपेक्षा कमी वेळात अंतर पार केले.
डबल स्कल्स प्रकारात सर्व्हिसेस स्पोर्टस कंट्रोल बोर्ड संघाच्या कुलविंदर सिंग व करमजीत सिंग या जोडीने 06:59.3 वेळ नोंदवत अव्वल स्थान पटकावले. क्वाड्रापल स्कल्समध्ये सर्व्हिसेसच्या आशिष फुगट, जाकर खान, करमजीत सिंग, कुलविंदर सिंग यांनी 06:26.7 वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावत आगेकूच केली.
कॉक्सलेक्स प्रकारात सनी कुमार व इकबाल सिंग यांनी 07:21.8. वेळ नोंदवत चौथा क्रमांक पटकावला.
महिला गटात मध्यप्रदेश संघाने लाईट वेट डबल स्कल्स, कॉक्सलेक्स प्रकार, क्वाड्रापल स्कल्स आणि सिंगल स्कल्स या चार प्रकारात उपांत्य फेरीत प्रवेश केला. मणिपूर, केरळ, ओरिसा आणि तामिळनाडू या संघांनी देखील आगेकूच केली
डबल स्कल्समध्ये मध्यप्रदेशच्या पुनम आणि रुकमनी डांगी यांनी 08:07.0 वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला. क्वाड्रापल स्कल्समध्ये विंध्या संकित, पूनम कुशप्रीत कौर, रुकमनी दांगी यांनी 07:32.8 वेळ नोंदवत प्रथम स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या आर्या नाईक, कस्तुरी चौगुले, अक्षदा निगल, सानिका माने 07:50.1 वेळ नोंदवत दुसऱ्या स्थानासह उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सिंगल स्कल्स प्रकारात मध्यप्रदेशच्या कुशप्रीत कौर(08:40.3)ने वेळ नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. तर, महाराष्ट्राच्या मृण्मयी सालगावकर (08:35.4) वेळ नोंदवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
महत्वाच्या बातम्या –
वरीष्ठ गटाची राष्ट्रीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा । महाराष्ट्राच्या पृथ्वीराज, सोनबा यांना सुवर्णपदक
U19 World Cup । भारताचा सलग चौथा विजय, मुशीर-सौम्यच्या धक्याने न्यूझीलंड नेस्तनाबूत