जागतिक क्रिकेटमध्ये असे अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम नावावर केले आहेत. या नावांमध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. ते नाव इतर कोणते नसून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याचे आहे. आफ्रिदीने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 31व्या सामन्यात बांगलादेशविरुद्ध जबरदस्त विक्रम नावावर केला आहे.
कोलकाता (Kolkata) येथील इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी बांगलादेशकडून डावाची सुरुवात करण्यासाठी तंजीद हसन आणि लिटन दास उतरले होते. तसेच, पाकिस्तानकडून पहिले षटक शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) टाकत होता. यावेळी पहिल्याच षटकात आफ्रिदीला विकेट मिळाली.
पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर 23 वर्षीय शाहीन आफ्रिद (Shaheen Afridi) याने फलंदाज तंजीद हसन याला तंबूचा रस्ता दाखवला. तंजीद 5 चेंडू खेळून शून्यावर बाद झाला. विशेष म्हणजे, हे षटक निर्धाव पडले. अशात आफ्रिदीने ही विकेट घेताच, त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो वनडेत सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणारा तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज ठरला. त्याने 51व्या सामन्यात हा पराक्रम केला.
Shaheen Shah Afridi is the fastest to complete 100 wickets in ODI history. [Fast bowlers] pic.twitter.com/Ybo3fWwdch
— Johns. (@CricCrazyJohns) October 31, 2023
वनडेत सर्वात वेगवान 100 विकेट्स घेण्याचा विक्रम नेपाळच्या संदीप लामिछाने याच्या नावावर आहे. त्याने 42 सामन्यात हा पराक्रम केला होता. त्यानंतर यादीत दुसऱ्या स्थानी राशिद खान असून त्याने 44 सामन्यात ही कामगिरी केली होती. तसेच, चौथ्या स्थानावरील मिचेल स्टार्कने 52 आणि पाचव्या स्थानावरील सकलेन मुश्ताक यांनी 53 सामन्यात हा पराक्रम केला होता.
वनडेत सर्वात वेगवान 100 विकेट्स घेणारे गोलंदाज (सामन्यानुसार)
42 – संदीप लामिछाने
44 – राशिद खान
51 – शाहीन आफ्रिदी*
52 – मिचेल स्टार्क
53 – सकलेन मुश्ताक
दुसऱ्या षटकात दुसरी विकेट
विशेष म्हणजे, आफ्रिदीला आपल्या दुसऱ्या षटकातही विकेट मिळाली. त्याने षटकातील चौथ्या चेंडूवर नजमुल होसेन शांतो याला उसामा मीर याच्या हातून झेलबाद केले. यावेळी शांतोला 3 चेंडूत 4 धावा करून तंबूचा रस्ता पकडावा लागला. (Shaheen Shah Afridi is the fastest to complete 100 wickets in ODI history)
हेही वाचा-
टॉस जिंकत बांगलादेश करणार Batting, शाकिब म्हणाला, ‘आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नाही’, पाकिस्तानमध्ये 3 बदल
इंग्लंडच्या पराभवानंतर चिडले रवी शास्त्री; म्हणाले, ‘तुम्ही स्वत:ला वर्ल्ड चॅम्पियन म्हणवता? आता…’