भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने बुधवारी (१३ मे) रोहित शर्मा आणि डेव्हिड वॉर्नरच्या तक्रारींचे उत्तर दिले आहे. ज्या त्यांनी नुकतेच इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान चर्चा केली होती.
रोहितने (Rohit Sharma) धवनवर आरोप केला होता की, तो केव्हाच पहिला चेंडू खेळत नाही. तर वॉर्नरने म्हटले होते की, धवन (Shikhar Dhawan) नेहमी शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतो. त्यामुळे आता धवनने इरफान पठाणबरोबर (Irfan Pathan) चर्चा करताना रोहितच्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
तो म्हणाला की, “मला पहिला चेंडू खेळायला आवडत नाही. जर माझा पार्टनर (साथीदार) युवा असेल तर मी त्याच्याशी चर्चा करतो. जर त्याला खेळता आले नाही, तर मी नक्कीच पहिल्यांदा फलंदाजी करेल.”
“मी २०१३ मध्ये भारतीय संघात पुनरागमन केले होते आणि रोहितने सलामीवीर फलंदाज म्हणून पहिला सामना खेळला होता. त्यावेळी रोहितने प्रथम फलंदाजी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत तोच प्रथम फलंदाजी करत आहे,” असेही धवन पुढे म्हणाला.
यानंतर वॉर्नरच्या आरोपांची उत्तरे देताना धवन म्हणाला की, “वॉर्नर म्हणत होता की, मी नेहमी शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतो. परंतु मी याबद्दल सहमत नाही.”
धवनने यावेळी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील काही गोष्टींचा खुलासा केला. तो म्हणाला की, “रोहित आणि मोहम्मद शमी नेहमी ड्रेसिंग रूममध्ये विश्रांती घेतात. ते खूप कूल राहतात. भारतीय संघात सर्वात गंभीर मूडमध्ये कोण रहात असेल तर तो जसप्रीत बुमराह आहे. तो नेहमी गंभीर असतो.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-या क्रिकेटरला सरकारने दिली होती जीवे मारण्याची धमकी, संन्यास घेऊन केली देवाची सेवा
-युवराज म्हणतो, आयपीएलमधील हा संघ खूपच खराब
-मी आजपर्यंत धोनीला कधीही विचारलं नाही की मला संघातून का काढलं?