पाच वेळची आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सचे आयपीएल २०२२मध्ये बारा वाजले. मुंबईवर इतकी खराब परिस्थिती आलीये की मागची पुण्याई, पाच वर्ल्ड क्लास कोच आणि नवी टीम असताना सलग पाच मॅच ते हरलेत. टीम म्हणून मुंबई कमी पडत असली, तरी संघाच्या यंग गन्स धडाडतायेत. आधी तिलक वर्माने साऱ्यांना इंप्रेस केले आणि आता डेवाल्ड ब्रेविसने. डेवाल्ड ब्रेविस उर्फ ‘बेबी एबी’ होय.
पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर आयपीएल २०२२ची २३वी मॅच झाली. या वर्षी नव्याने सुरुवात केलेल्या पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सचे आव्हान स्विकारले. पहिली बॅटिंग करत पंजाबने मुंबईच्या बॉलर्सची दाणादाण उडवली. १९९ चे टारगेट त्यांनी मुंबईच्या बॅटर्ससमोर ठेवले. सगळ्यांचे आशास्थान कॅप्टन रोहित शर्मा थोडीफार बॅट चालवून माघारी परतला. ईशान किशनच अपयश कायम राहिल. तिसऱ्या नंबरवर बॅटिंगला आला डेवाल्ड ब्रेविस.
तो आयपीएलमधील आपली फक्त तिसरी मॅच खेळत होता. सुरुवातीचे पाच-सहा बॉल त्याने जरा पाहूनन घेतले आणि त्यानंतर दाखवून दिले आपल्याला बेबी एबी का म्हणतात. जसा जसा राहुल चहर बॉलिंग करायला आला तसा तो त्याच्यावर तुटून पडला. राहुल चहर म्हणजे इंडियाच्या स्पिन बॉलींगमधील जानेमाने नाव. पंजाबच्या तर स्पिन डिपार्टमेंटचे नाकच तो. दुसऱ्या बॉलला त्याला स्ट्राइक आली आणि त्याने फोर मारला. त्यानंतर सिक्सचाच फोर त्याने मारला. सलग चार बॉलला चार सिक्स मारत त्याने सर्वांना तोंडात बोटे घालायला लावली. तंतोतंत एबी डिव्हिलियर्स वाटावा अशी त्याची बॅटिंग पाहून सारे जण अवाक् झाली.
हेही पाहा- एबी डिविलियर्सचा खरा वासरदार डेवाल्ड ब्रेविसच्या यशाची गोष्ट
ब्रेविसचे बेबी एबी नाव जगाला कळले ते याच वर्षीच्या अंडर नाईन्टीन वर्ल्डकपवेळी. इंडिया साऊथ आफ्रिका मॅचमध्ये त्याची बॅटिंग एकदम डिव्हिलियर्ससारखी वाटत होती. इतक्यात त्याने फिफ्टी पूर्ण केली आणि त्यांच्या ड्रेसिंग रूममधून त्याच्याच टीममेटने पोस्टर दाखवला बेबी एबी. संघात त्याला सारे याच नावाने हाक मारतात. त्याचा प्रत्येक शॉट आपल्याला एबी डीविलियर्सची आठवण करून देतो. बरं तो केवळ डीव्हिलियर्ससारखा खेळतो इतकीच त्यांच्यात समानता नाही. डिव्हिलियर्स ज्या शाळेत शिकला त्याच शाळेचा तोदेखील विद्यार्थी. दोघांचाही जर्सी नंबर १७ चं. त्या दोघांमधील बॉंडही इतका मजबूत आहे की, डिव्हिलियर्स त्याला २०२१ पासून मेंटर करतोय.
ऑल टाईम ग्रेटसोबत तुलना होतेय म्हटल्यावर तसा परफॉर्मन्स दाखवणे गरजेचे असते. त्याने तेच केले. अंडर नाईन्टीन वर्ल्डकपमधील त्याची आकडेवारी पाहून तुम्हाला तो नेक्स्ट एबी का आहे, हे समजून जाईल.
तो वर्ल्डकपच्या सहा मॅच खेळला आणि दोन सेंचुरी आणि तीन हाफ सेंचुरी करत ५०६ रनांचा रतीब त्याने घातला. कितीतरी जुने रेकॉर्ड मोडले आणि नवे रेकॉर्ड या एकाच वर्ल्डकपमध्ये त्याने बनवले. वर्ल्डकपमध्ये जगातील जवळपास २५० यंग प्लेयर खेळले, पण टॅलेंटच्या बाबतीत एकही खेळाडू त्याच्या आसपासही दिसला नाही. अंडर नाईन्टीन वर्ल्डकप गाजवल्यानंतर त्याचा नेक्स्ट स्टॉप होता वर्ल्ड बिगेस्ट टी२० लीग आयपीएल.
इनफॉर्म ब्रेविसला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळणार हे जवळपास निश्चित झाले होते. मेगा ऑक्शनमध्ये त्याचे नाव ऐकताच सीएसके आणि पंजाब त्याच्या मागे धावायला लागले. बोली दीड कोटीच्यावर गेली आणि मुंबईने एन्ट्री केली. त्यानंतर तीन कोटीपर्यंत ते मागे हटले नाहीत. अखेर बेबी एबी मुंबईकर झाला.
त्याला जेव्हा आयपीएल डेब्यूची संधी दिली गेली तेव्हा तो कोणालाही १८ वर्षाचा वाटला नाही. वरून चक्रवर्तीची मिस्ट्री त्याने पहिल्याच बॉलला सोडवत सिक्स मारला. तुफान फॉर्ममध्ये चाललेल्या उमेश यादवला कव्हर्समधून सिक्स मारायची ताकत त्याने दाखवली. एकच काय तर, आयपीएलमधील आपला पहिला बॉल टाकताना त्याने चक्क ‘द विराट कोहली’ला एलबीडब्लू केले. त्यानंतर आता पंजाबविरूद्ध त्याने जो काही विस्फोट केला त्यावरून एक गोष्ट नक्की आहे की, तो पहिलीच आयपीएल दणाणून सोडणार.
ब्रेविस बेबी एबी म्हणून जरी आपली ओळख तयार करत असला तरी, त्याची स्वतःची छाप तो पाडण्यात यशस्वी ठरतोय. त्याचं टॅलेंट पाहून एक गोष्ट मात्र नक्की म्हणता येईल की, पुढची दोन दशके इंटरनॅशनल आणि साऊथ आफ्रिका क्रिकेट सुरक्षित हातात आहे. कारण डेवाल्ड ब्रेविसने दाखवून दिलेय की ‘स्टार इन द मेकिंग.’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रेल्वेत ‘गँगमन’ ते आयपीएल टीम्सचा ‘लकी चार्म’, वाचा एका दिवसात करोडपती बनलेल्या कर्णबद्दल
इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला
आयपीएलला मोठी करणारे पाच श्रीलंकन लिजेंड, यांच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजे