ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून उभय संघात नुकतीच ३ सामन्यांची टी२० मालिका झाली आहे. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवार रोजी (१२ जून) पल्लेकेले स्टेडियम येथे झाला. या सामन्यात श्रीलंकेकडून दसुन शनाका याने कर्णधार खेळी करत संघाला गोड शेवट करून दिला. श्रीलंकेने हा सामना ४ विकेट्स राखून जिंकला. मात्र ऑस्ट्रेलियाने २-१ च्या फरकाने मालिकेवर नाव कोरले.
या सामन्यात (Sri Lanka vs Australia) प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकात ५ विकेट्सच्या नुकसानावर १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने १९.५ षटकातच ४ विकेट्स बाकी असताना ऑस्ट्रेलियाचे लक्ष्य पूर्ण केले.
दसुन शनाकाची झुंजार खेळी
ऑस्ट्रेलियाच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून कर्णधार शनाकाने (Dasun Shanaka) सर्वाधिक धावा केल्या. संघ कठीण परिस्थितीत असताना त्याने २५ चेंडूत नाबाद ५४ धावांची झंझावाती खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ षटकार आणि ५ चौकार मारले. त्याच्याबरोबरच चरिथ असलांकाने २६ धावा आणि पथुम निसांकाने २७ धावांचे योगदान दिले. परिणामी श्रीलंकेने १ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
या डावात ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवुड आणि मार्कस स्टॉयनिस यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच झाय रिचर्डसन व ऍश्टन ऍगर यांनीही प्रत्येकी एका विकेटचे योगदान दिले.
Superstar Shanaka 🌟
Late heroics from the Sri Lankan captain guide the hosts through to a thrilling victory over Australia in Pallekele.
Watch the #SLvAUS series on https://t.co/MHHfZPyHf9 (in select regions)
Scorecard: https://t.co/WMv9vUSU7h pic.twitter.com/PKBzny6bRh
— ICC (@ICC) June 11, 2022
तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर डेविड वॉर्नरने सर्वाधिक ३९ मार्कस स्टॉयनिसने ३८ धावा केल्या होत्या. तसेच स्टिव्ह स्मिथनेही नाबाद ३७ धावा जोडल्या होत्या. याशिवाय मॅथ्यू वेडनेही ८ चेंडूत नाबाद १३ धावांचे योगदान दिले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सांघिक खेळ दाखवत निर्धारित २० षटकात १७६ धावा फलकावर लावल्या.
या डावात श्रीलंकेकडून महिश थिक्षाणाने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तसेच वानिंदू हसरंगा आणि प्रविण जयविक्रमाने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.
ऑस्ट्रेलियाने आधीच खिशात घातली मालिका
भलेही श्रीलंका संघाने तिसरा टी२० सामना जिंकला असला तरीही, ऑस्ट्रेलिया संघाने पहिले सलग २ सामने जिंकत मालिका जिंकली होती. पहिला टी२० सामना १० विकेट्सने जिंकत व त्यानंतर दुसऱ्या टी२० सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने मालिकेवर नाव कोरले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय क्रिकेटर्सशी लग्नगाठ बांधणाऱ्या अभिनेत्री, ज्यांनी विवाहानंतर बॉलिवूडला ठोकला रामराम
भारतावर परमाणू बॉम्ब टाकण्याची धमकी देणारा पाकिस्तानी क्रिकेटर, ठोकलीत ३१ शतके
स्लेजिंगचे बादशाह समजले जाणारे पाकिस्तानी दिग्गज, खरं तर क्रिकेटचे आर्य चाणक्य होते!