कोलंबो। भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात श्रीलंका आणि भारत संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (२७ जुलै) होणार आहे.
मालिकेत आघाडीवर आहे भारतीय संघ
या मालिकेतील पहिला सामना रविवारी (२५ जुलै) रोजी पार पडला होता. या सामन्यात भारताने ३८ धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याचा भारतीय संघाचा विचार असेल. तर, श्रीलंका संघ मालिकेत बरोबरी करण्याच्या हेतूने मैदानात उतरेल.
भारतीय संघाच्या अंतिम ११ जणांमध्ये बदल होण्याची शक्यता
श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव यांना इंग्लंड दौऱ्यासाठी बोलावणे आले आहे. सध्या भारताचा कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्यासाठी गेलेल्या ३ खेळाडूंना दुखापती झाल्याने शॉ आणि सूर्यकुमार यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड करण्यात आली. त्यामुळे, हे दोघेही मंगळावारी श्रीलंकेविरुद्धच्या टी२० सामना खेळताना दिसण्याची शक्यता कमी आहे.
त्यांच्याऐवजी देवदत्त पडीक्कल किंवा ऋतुराज गायकवाडला पदार्पणाची संधी मिळू शकते. तसेच नितीश राणा किंवा मनिष पांडेलाही अंतिम ११ जणांमध्ये संधी मिळू शकते.
आमने-सामने कामगिरी
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारत आणि श्रीलंका संघात २० सामने झाले आहेत. त्यातील १४ सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तसेच ५ सामने श्रीलंकेने जिंकले आहेत, तर एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.
कधी, कुठे आणि केव्हा होणार श्रीलंका विरुद्ध भारत दुसरा टी२० सामना घ्या जाणून –
१. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना केव्हा होणार?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना २७ जुलै रोजी खेळला जाणार आहे.
२. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना कुठे खेळवला जाणार ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे खेळवला जाईल.
३. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना किती वाजता सुरु होणार ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्या. ७.३० वाजता नाणेफेक होईल.
४. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– श्रीलंका विरुद्ध भारत संघातील दुसऱ्या टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण Sony Liv या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया, युजवेंद्र चहल.
श्रीलंका संघ – अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरिथ असलंका, अशेन बंडरा, दसून शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उडाना, दुशमंथा चमिरा, अकिला धनंजया, भानुका राजपक्ष, ईशान जयरत्ने, बिनूरा फर्नांडो, रमेश मेंडिस, कसून राजीता, लाहिरू कुमारा, असिता फर्नांडो, लक्षण संदकन, प्रवीण जयविक्रमा, धनंजया लक्षण, पथम निसानका, लाहिरू उदारा, शिरण फर्नांडो.
महत्त्वाच्या बातम्या –
टोकियो ऑलिंपिक: ‘असे’ आहे भारताचे ५ व्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक; पाहा कोणते खेळाडू उरणार मैदानात
टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी मीराबाई चानू परतली मायदेशी; दिल्लीत पोहचताच झाले जंगी स्वागत