भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि निवडकर्ते हार्दिक पंड्याच्या भारतीय संघातून बाहेर पडण्यानंतर सतत एका नविन अष्टपैलूच्या शोधात आहेत. त्यांनी व्यंकटेश अय्यरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय संघात खेळण्याची संधी दिली होती. पण तो काही खास कामगीरी करु शकला नाही. त्यामुळे एकदिवसीय मालिकेनंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. आता नव्या अष्टपैलू खेळाडूचा शोध सुरु असताना भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने (gautam gambhir) संध व्यवस्थापनाला हा शोध बंद करा असा सल्ला दिला आहे. आपण पुढचा कपिल देव (Kapil Dev) शोधणे बंद केले पाहिजे, असे त्याने म्हटले आहे.
भारताचा हा माजी खेळाडू म्हणाला, “आपण नेहमी या गोष्टीवर बोलत असतो की कपिल देवनंतर भारतीय संघात एका शानदार अष्टपैलूची गरज आहे. आपण नेहमीच एका अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. खर तर आपल्याला हा शोध बंद करायला हवा. असं करण्यापेक्षा आपल्याला रणजी आणि इतर देशांतर्गत क्रिकेटमधून अष्टपैलू खेळाडू तयार करायला हवेत. जेव्हा ते खेळाडू तयार होतील तेव्हा त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी द्यायला हवी.”
पुढे गंभीर म्हणाला, “जर तुम्हाला असे आढळले की देशांतर्गत क्रिकेटमध्ये असा खेळाडू नाही, तर तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. जे आहे, त्याचा स्विकार करुन आपल्याला पुढे जायला हवे. आपण जी गोष्ट तयार करु शकत नाही त्याकडे जास्त लक्ष देऊ नका.”
भारतीय निवडकर्ते सतत चांगल्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहेत. दीपक चहर आणि शार्दुल ठाकुर यांना सुद्धा या स्थानी निवडले जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत या दोन खेळाडूंनी चांगली कामगीरी केली होती.
हेही वाचा- अखेर भारतातील सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचा लागला मुहूर्त! रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर
भारतीय क्रिकेटचे माजी दिग्गज फलंदाज सुनिल गावसकर यांनी दीपक चहरच्या बाबतीत मोठे व्यक्तव्य केले आहे. चहरला अजून संधी देण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटलं आहे. चहल हा भुवनेश्वर कुमारपेक्षा चांगला पर्याय आहे आणि तो फलंदाजीही उत्तम करु शकतो, तसेच त्याने दोन एकदिवसीय अर्धशतक लगाावली आहेत, असे गावसकर यांनी म्हटलं आहे.
भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासुन अहमदाबाद येथे खेळणार आहे. तसेच १६ फेब्रुवारीपासुन ३ सामन्यांची टी२० मालिका कोलकत्ता येथे खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अखेर भारतातील सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धेचा लागला मुहूर्त! रणजी ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर