भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान राजकोट येथे तिसरा टी20 सामना खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हार्दिक पंड्याने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला. या मालिकेसाठी उपकर्णधार पदाची जबाबदारी मिळालेल्या सूर्यकुमार यादव याने श्रीलंकेच्या गोलंदाजांची पिसे काढत शानदार शतक साजरे केले. हे त्याच्या टी20 कारकिर्दीतील तिसरे शतक ठरले.
CENTURY for @surya_14kumar
A third T20I 💯 in just 43 innings.
Take a bow, Surya!#INDvSL @mastercardindia pic.twitter.com/HZ95mxC3B4
— BCCI (@BCCI) January 7, 2023
मुंबई येथील पहिल्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवने पुणे येथील दुसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर या तिसऱ्या सामन्यात उतरताना त्याने श्रीलंकन गोलंदाजांवर पहिल्य चेंडूपासून वर्चस्व गाजवले. राहुल त्रिपाठी आक्रमक खेळी करून बाद झाल्यानंतर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार फलंदाजीला आला. वेगवान आणि फिरकी अशा दोन्ही पद्धतीच्या गोलंदाजांना त्याने फोडून काढत 33 चेंडूवर आपले 14 वे आंतरराष्ट्रीय टी20 अर्धशतक पूर्ण केले.
त्यानंतर तर त्याने चौथ्या गिअरमध्ये फलंदाजी करत धावांचा स्ट्राइक रेट वाढवला. महिश तिक्षणा व दिलशान मधुशंका यांच्यावर त्यांनी सलग दोन षटकात हल्ला करत आपल्या शतकाकडे आगेकूच केली. त्याने अवघ्या 45 चेंडूवर 6 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने आपले तिसरे टी20 शतक पूर्ण केले. तसेच हे भारताकडून झळकावले गेलेले दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले. यापूर्वी त्याने मागील वर्षी इंग्लंड व न्यूझीलंडविरुद्ध शतके साजरी केली होती.
त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत या सामन्यात 7 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 112 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 219 पेक्षा जास्त होता.
(Suryakumar Yadav Hits 3rd T20I Century In Rajkot Against Srilanka)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हा तर गोलंदाजांचा अपमान’, रन-आऊट प्रकरणात अश्विनने घेतली ऍडम झम्पाची बाजू, डेविस हसीला सुनावले
श्रीलंकेचा दिग्गज कुमार संगकारा फिट, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये केले गेले यशस्वी उपचार