बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतने मागीलवर्षी १४ जून २०२० ला वांद्र्यातील राहत्याघरी मृतअवस्थेत सापडला होता. त्यानंतर अनेक चर्चा झाल्या. सुशांतच्या जाण्याबद्दल सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त झाली होती. त्या घटनेला आज दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
सुशांतने त्याच्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले आहे. छोट्या पडद्यापासून कारकिर्दीची सुरुवात केलेल्या सुशांतचा प्रवात बॉलिवूड अभिनेत्यापर्यंत झाला होता. त्याचा भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारित ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट गाजला होता. या चित्रपटात त्याने धोनीची भूमिका केली होती. त्यावेळी त्याने धोनीची भूमिका हुबेहुब निभावल्याने मोठे कौतुक झाले होते.
हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी सुशांतने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, धोनी आणि त्याचा प्रवास सारखाच आहे. दोघांनीही सुरुवातीच्या संघर्षानंतर यश मिळवले होते. धोनीनेही एक तिकीट कलेक्टर ते भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार असा प्रवास केला आहे.
सुशांत म्हणाला होता की त्याच्यातील आणि धोनीच्या जीवनातील समानतेमुळे त्याला धोनीची भूमिका निभावताना मदत झाली होती. तो म्हणाला होता, ‘मी त्याच्या जीवनाच्या प्रवासात माझ्या प्रवासाचा विचार करायचो. त्यामुळे मला त्याची भूमिका निभावणे सोपे झाले.’
धोनी आणि त्याच्यातील समानतेबद्दल सुशांत म्हणाला होता की ‘जरी आमचे क्षेत्र वेगवेगळे असले तरी पॅटर्न एकच आहे. आम्ही वेगवेगळ्या फ्रंटवर जोखीम पत्करली आणि यशाची चव चाखली.’
तसेच धोनीकडून तो काय शिकला याबद्दल त्याने सांगितले होते, ‘शुटिंगच्या वेळी मी स्वत:ला धोनी समजत होतो. धोनीमुळे मी एक चांगला माणूस बनायला शिकलो. पहिले कोणी कल्पनाही करु शकत नव्हते, की बिहार-झारखंड सारख्या राज्यातून एक साधा मुलगा इतका मोठा क्रिकेटपटू बनेल. धोनीच्या मेहनतीने सर्वकाही शक्य झाले. त्याचे आयुष्य खूप प्रेरणादायक आहे. कठीण परिस्थितीतूनही मी शांत रहायला शिकलो.’
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
तिसऱ्या कसोटी सामन्यांत भारतीय संघात होणार ‘हे’ मोठे बदल, जाणून घ्या कशी असेल संघाची ‘प्लेइंग ११’
‘सचिन नंतर फक्त ‘या’ खेळाडूचा खेळ बघण्यास उत्सुक आहे’, सुनिल गावस्करांनी जाहिर केली इच्छा