धोनीची भूमिका साकारणारा अभिनेता सुशांतने १४ जून २०२० रोजी आपल्या वांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागील कारण २ महिन्यांनंतरही अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सुशांतने ज्या पद्धतीने धोनीला मोठ्या पडद्यावर उतरवले होते, ते खूप प्रशंसणीय होेते. विशेष म्हणजे, सुशांतला क्रिकेटची खूप आवड होती. शिवाय, त्याला धोनीसारख्या शानदार भारतीय क्रिकेटपटूची भूमिका करायला मिळणे हे त्याचे सौभाग्यच होते.
धोनीच्या बायोपिकचे काम सुरु होण्यापुर्वी सुशांत ३ वेळा धोनीला भेटला होता. या तिन्ही भेटींदरम्यान दोघांनीही मनभरुन चर्चा केली होती. एका मुलाखतीत सुशांतने सांगितले होते की, “त्याने धोनीचे खूप व्हिडिओ पाहिले होते. तो ३ वेळा धोनीला भेटला होता.” पहिल्या मिटिंगमध्ये सुशांत धोनीला म्हणाला होता की, “तू फक्त तुझ्याविषयी सांग आणि मी फक्त तुला ऐकेल.” दुसऱ्या मिटिंगमद्ये सुशांतने धोनीला अनेक प्रश्न विचारले आणि धोनीने त्याच्या प्रश्नांची उत्तरेही दिली होती.
तिसऱ्या मिटिंगपुर्वी धोनी आणि सुशांत सोबत होते. सुशांतने धोनीला स्क्रिप्टसंबंधी अनेक प्रश्न विचारले आणि शूटिंग सुरु होण्यापुर्वी स्वत:ला पूर्णपणे धोनीच्या भूमिकेत आणले होते.
एका मुलाखतीत सुशांतने सांगितले होते की, “त्याला लहानपणी क्रिकेटपटू बनायचे होते. परंतु, राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू बनण्याइतपत त्याच्यामध्ये क्षमता नव्हती. त्यामुळे त्याने अभिनय क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवला.”
आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत सुशांतने सांगितले होते, “लहान असताना कोणताही क्रिकेट हंगाम सुरु होण्याआधी तो तारिखेची नोंद करत असायचा. विशेषत:, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची. तो भारत-पाकिस्तानच्या सामन्यादरम्यान दिवसभर सामना पाहण्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम करत नसायचा.”