भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना व पाच कसोटी सामन्यांची इंग्लंड विरुद्धची मालिका खेळण्यासाठी २ जून रोजी रवाना होणार आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये असताना दुसरा भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळू शकतो. या मालिकेसाठी दावेदार असणारा व आयपीएल दरम्यान दुखापतग्रस्त झालेला वेगवान गोलंदाज हा दुखापतीतून सावरत असल्याची माहिती सनरायझर्स हैदराबाद संघाने ट्विट करून दिली आहे.
सनरायझर्स हैदराबादने केले ट्विट
सनरायझर्स हैदराबादचा प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला टी नटराजन आयपीएल २०२१ मध्ये दोन सामने खेळल्यानंतर दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो यानंतर संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला. त्याने या दोन सामन्यात मिळून दोन बळी मिळवले होते.
आता नटराजन या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाल्याचे दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादकडून नटराज यांचे एक छायाचित्र ट्विटरवर टाकण्यात आले असून त्याला, ‘रिकव्हरी मोड ऑन फॉर टी नटराजन’ असे कॅप्शन दिले आहे. नटराजनने मागील आठवड्यात आपण तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहोत असे म्हटले होते.
Recovery mode 🔛 for @Natarajan_91
Comment with a 💪 to wish him well.#OrangeArmy #OrangeOrNothing pic.twitter.com/xZFAq44nz9
— SunRisers Hyderabad (@SunRisers) May 24, 2021
आयपीएल झाली आहे स्थगित
आयपीएल २०२१ मध्ये अचानकपणे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ही स्पर्धा स्थगित केली गेली. सर्वप्रथम संदीप वॉरियर व वरून चक्रवर्ती ठेक्याचे खेळाडू पॉझिटिव्ह सापडलेले. त्यानंतर अमित मिश्रा, वृद्धिमान साहा, टिम सिफर्ट या खेळाडूंचे देखील अहवाल सकारात्मक आले. ४ मे रोजी स्पर्धा २९ सामन्यांनंतर थांबवली गेली.
अशी आहे नटराजनची कारकीर्द
टी नटराजनने मागील वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्याने आत्तापर्यंत १ कसोटी, २ वनडे व ४ टी२० सामने खेळले असून यामध्ये अनुक्रमे ३, ३ व ७ बळी आपल्या नावे केले आहेत. तो आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारताच्या महिला क्रिकेटपटूंना प्लेयर्स असोसिएशनची नितांत गरज”, माजी खेळाडूचे प्रतिपादन
पंड्या बंधूंनी पाळला शब्द! कोरोना रूग्णांना दिली ‘ही’ मदत