अफगाणिस्तानमधील राजकीय गोंधळामुळे तालिबानने देशाचा ताबा घेतला आणि तेथील परिस्थिती सध्या इतकी चांगली नाही. दरम्यान, काबूलचे नवे शासक गुरुवारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे (एसीबी) मुख्यालय गाठल्याची बातमी आली आहे. विशेष म्हणजे, देशासाठी दोन एकदिवसीय सामने खेळणारे माजी क्रिकेटपटू अब्दुल्लाह मजारी तालिबान लढाऊंसोबत बोर्डाच्या कार्यालयात दिसले.
व्हायरल झालेला फोटो
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोत सशस्त्र तालिबान लढाऊ एसीबीच्या कॉन्फरन्स हॉलवर कब्जा करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारी म्हणाले होते की, “अफगाणिस्तान क्रिकेट आणि त्याचे खेळाडूंचे भविष्य धोक्यात नाही. तालिबान क्रिकेट आणि खेळांचे समर्थन करतो आणि देश ताब्यात घेताना त्याचा खेळाडूंना त्रास होणार नाही.”
हमीदने हे देखील आश्वासन दिले होते की, क्रिकेटपटूंची कुटुंबे सुरक्षित आहेत. राशिद खान युकेमधून आपली चिंता व्यक्त करत होता. तिथे तो द हंड्रेडमध्ये खेळत आहे.
तालिबानला क्रिकेट आवडते
हमीद म्हणाला होता की, “तालिबानला क्रिकेट आवडते. त्यांनी आम्हाला सुरुवातीपासूनच साथ दिली आहे. त्यांनी आमच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही. मला कोणताही हस्तक्षेप दिसत नाही आणि मी त्यांच्या समर्थनाची अपेक्षा करतो. जेणेकरून आमच्या क्रिकेटमध्ये प्रगती होईल. आम्हाला एक सक्रिय अध्यक्ष मिळाला आहे, पुढील सूचना येईपर्यंत मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहीन.”
अफगाणिस्तान टी-२० विश्वचषकातही खेळेल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तान संघाचे क्रिकेट व्यवस्थापक हेक्मत हसन यांनीही स्पष्ट केले होते की, संघ आगामी युएईमध्ये टी-२० विश्वचषक खेळणार आहे आणि त्याची तयारी देखील सुरू आहे. श्रीलंकेतील पाकिस्तानविरुद्धची मालिका देखील तालिबानकडून ताब्यात घेतल्यानंतर संशयास्पद होती. परंतू, हसनने त्या सर्व बातम्यांचे खंडन केले.
Islamic Emirates Taliban have arrived in Afghanistan Cricket Board headquarters in Kabul accompanying by former national cricketer #AbdullahMazari too.#AFGvPAK pic.twitter.com/8uc7ix00I9
— M.Ibrahim Momand (@IbrahimReporter) August 19, 2021
तो म्हणाला की, “होय, आम्ही टी-२० विश्वचषक खेळू. त्याची तयारी देखील सुरू आहे आणि उपलब्ध खेळाडू पुढील काही दिवसांमध्ये प्रशिक्षणासाठी काबुलमध्ये परत येतील. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजचा समावेश असलेल्या त्रिकोणीय मालिकेसाठी आम्ही एक ठिकाण शोधत आहोत. टी-२० विश्वचषकासाठी ही सर्वोत्तम तयारी असेल. आम्ही श्रीलंकासारख्या काही देशांशी बोलत आहोत आणि मला वाटते मलेशिया सुद्धा यात आम्हाला साथ देईल. आम्ही हंबनटोटामध्ये पाकिस्तानशी खेळण्यासाठी आधीच तयार आहोत आणि त्या मालिकेची तयारीही सुरू आहे. तसेच, आम्ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा पुढे ढकलण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे टी-२० विश्वचषकापूर्वी खेळाडूंच्या तयारीला चालना मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी बांगलादेशचा संघ जाहीर, ‘या’ अनुभवी खेळाडूंचे पुनरागमन
पुन्हा उडणार देशांतर्गत क्रिकेटचा धुरळा! ‘या’ दिवशी सुरू होणार नवा हंगाम