भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. विराटने मागच्या जवळपास अडीच वर्षांपासून एकही शतक केले नाहीये. याच पार्श्वभूमीवर दिग्गज आणि चाहत्यांकडून त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहे. भारताला पहिला आयसीसी विश्वचषक जिंकवून देणाऱ्या कपिल देवने तर थेट विराटलासंघातून बाहेर करण्याची भाषा वापरली आहे. कपिल यांच्या या वक्तव्यानंतर खेळाडू आणि दिग्गाजंकडून समिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ऑस्ट्रेलियाचा महत्वाचा फलंदाज उस्मान ख्वाज्यानेही कपिलच्या या वक्तव्याला मजेत घेतले आहे.
आयसीसीने कपिल देव (Kapil Dev) यांनी केलेले हे वक्तव्य त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रान खात्यावरून शेअर केले आहे. या इंस्टा पोस्टवर उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) याने एक मजेशीर कमेंट करत स्वतःचे मत स्वष्ट केले आहे. ख्वाजाने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ५० ची सरासरी आणि १४० च्या स्ट्राईक रेटने धावा करणाऱ्या फलंदाजाला संघातून बाहेर करणाची भाषा. योग्य निर्णय आहे. ऑस्ट्रेलिया या वक्तव्याशी सहमत आहे. ख्वाजाने पुढे तीन स्माईलीच्या इमोजीही पोस्ट केल्या आहेत. याचाच अर्थ असा होतो की, त्याने कपिलचे हे वक्तव्य खूपच हलक्यात घेतले आहे.
काय म्हणाले होते कपिल देव
कपिल देव म्हटले होते की, जर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज रविचंद्रन अश्विन संघातून बाहेर होऊ शकतो, तर तुमचा क्रमांक एकचा फलंदाजालाही संघातून बाहे होऊ शकतो. जर तो चांगले प्रदर्शन करत नसेल, तर तुम्हा या युवा खेळाडूंना सतत संघातून बाहेर ठेवले जाऊ शकत नाही. मला अशा आहे की, निवडप्रक्रियेसाठी चांगला संघर्ष होईल. युवा खेळाडूंनी कोहलीपेक्षा चांगल्या प्रदर्शानासाठी प्रयत्न केला पोहिजे. पण विराटनेही विचार केला पाहिजे की, होय मी एकेकाळचा मोठा खेळाडू होतो. परंतु मला पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावरील खेळाडूप्रमाणे खेळण्याची गरज आहे.
कपिल देवच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्माने त्यांच्या मताशी सहमती दर्शवली नव्हती. रोहितच्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात असा प्रसंग येत असतो आणि एक-दोन मालिका खराब गेल्यामुळे एखादा खेळाडू खराब होत नसतो. संघातील खेळाडूंनाच खेळाडूंचे महत्व माहिती आहे. त्यांना याविषयी बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण आमच्यासाठी हे जास्त काही महत्वाचे नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित पॅटर्न: तब्बल ११ वर्षांपुर्वीच रोहितने सांगितलं होतं सुर्यकुमारचं भविष्य, पोरगं भविष्यात…
रंगतदार होणाऱ्या वनडे मालिकेत विराटकडून जबराट खेळीची अपेक्षा, नाहीतर…
कोल्हापूरची ऐश्वर्या विम्बल्डनमध्ये! देशातून होतोय कौतुकांचा वर्षाव, एकदा कामगिरी पाहाच