युनायटेड अरब अमिराती (यूएई) येथील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर सोमवारी (9 नोव्हेंबर) महिला टी20 चॅलेंज 2020 चा अंतिम सामना पार पडला. स्म्रीती मंधाना हिच्या नेतृत्त्वाखालील ट्रेलब्लेझर्सने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील सुपरनोव्हासचा 16 धावांनी पराभव केला. या सामन्यात ट्रेल्ब्लेझर्सची खेळाडू नट्टकन चान्टमने केलेल्या अफलातून क्षेत्ररक्षणाचीच चर्चा आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
ट्रेलब्लेझर्सने केल्या 118 धावा
हरमनप्रीतने नाणेफेक जिंकल्यानंतर ट्रेलब्लेझर्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. सलामीवीर डियांड्रा डॉटिन आणि स्म्रीती मंधाना या जोडीने 11 षटकांत 71 धावांची भागीदारी केली. तथापि, डावाच्या मधल्या षटकांत, सुपरनोव्हासच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. फिरकीपटू राधा यादवने पाच गडी बाद केले.
सुपरनोव्हासच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे ट्रेलब्लेझरने 20 षटकांत 8 बाद 118 धावा केल्या. ते शेवटच्या 5 षटकांत केवळ 17 धावा करू शकले. कर्णधार स्म्रीतीने तिच्या संघासाठी 49 चेंडूंत 68 धावांची सर्वाधिक महत्त्वपूर्ण खेळी केली.
नट्टकन चान्टमने केले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण
प्रत्युत्तरादाखल सुपरनोव्हासची सलामीवीर जोडी चमारी अटापट्टू आणि जेमिमाह रोड्रिगेज यांनी डावाची सुरुवात केली. ट्रेलब्लेझर्सची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने पहिल्या षटकात अवघ्या तीन धावा दिल्या. कर्णधाराने दुसरे षटक सोफी इक्लेस्टोनला दिले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर रोड्रिगेजने थर्ड मॅनच्या दिशेने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. पण नट्टकनच्या शानदार क्षेत्ररक्षणामुळे सुपरनोव्हासला अवघ्या 2 धावातच समाधान मानावे लागले.
चौकार रोखण्यासाठी नट्टकनने डाइव्ह मारली आणि चेंडू सीमारेषेला स्पर्श करण्याआधीच रोखला. नट्टकनने केलेल्या या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे तिच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Sharjah is the place to go for diving boundary stops. This just now from Nattakan Chantam in the Women’s T20 Challenge. Needs to put a bit more effort in, I’d say, she’s left a bit out there pic.twitter.com/XrsqtDB9Dm
— Paul Radley (@PaulRadley) November 9, 2020
That fielding effort 😍👏🏽👏🏽👏🏽
— Alexandra Hartley (@AlexHartley93) November 9, 2020
Nattakan Chantam – you are an absolute superstar! #WomensT20Challange
— Shikha Pandey (@shikhashauny) November 9, 2020
So bloody good !!! 👏 https://t.co/2hFDVqJxv8
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) November 9, 2020
So good! My back hurt just from watching that!! 😂
— Kate Cross (@katecross16) November 9, 2020
Amazing piece of athleticism 👏🏽👏🏽 https://t.co/5ZF5HPpEoz
— Lisa Sthalekar (@sthalekar93) November 9, 2020
So it was as good as @nicholas_47 ?? https://t.co/APQFmrQ1zp pic.twitter.com/XscAUNNLjl
— Eoin Morgan (@Eoin16) November 9, 2020
Terrific to see Chantam field. So good for the women’s game. Thailand is a superb story. This is now a tough chase even with dew. #WomensT20Challenge
— Boria Majumdar (@BoriaMajumdar) November 9, 2020
Chantam, What a fielder she is, amazing!🙌👏❤
Probably better than some of the male fielders as well! Gives her everything! #JioWomensT20Challenge— Reema Malhotra (@ReemaMalhotra8) November 9, 2020
ट्रेलब्लेझर्सने पहिल्यांदाच जिंकला किताब
या सामन्यात सुपरनोव्हासला अवघ्या 102 धावाच करता आल्या आणि ट्रेलब्लेझर्सने पहिल्यांदाच महिला आयपीएलचा किताब जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
-Video: मिशेल स्टार्कचा रुद्रावतार! कर्णधाराच्या ‘त्या’ निर्णयामुळे रागाने जमिनीवर आदळली बॅट
-Video -“तुला ऑस्ट्रेलियातच भेटेल”, डेविड वॉर्नरचा हैदराबादच्या यॉर्कर किंगला खास संदेश
-Qualifier 2 : कागिसो रबाडाच्या स्विंगमुळे वॉर्नरची दांडी गुल, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
-चौथी शिकलेल्या पोराच्या फिरकीपुढे भल्याभल्यांनी घेतलीये गिरकी; वाचा मुंबईच्या प्रमुख फिरकीपटूबद्दल
-भावा तु संघात असलास की दिल्लीचे चाहते शेवटपर्यंत निवांत असतात; पाहा कोण आहेत दिल्लीचे संकटमोचक