आपली डगमगलेली गाडी पुन्हा रुळावर आणण्याच्या दिशेने शनिवारी (२३ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील ११वा सामना खेळला. शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह येथे झालेला हा सामना चेन्नईचा आयपीएलमधील तब्बल २००वा सामना होता.
यासह चेन्नई संघ आयपीएलमध्ये २०० सामन्यांचा टप्पा पार करणारा चौथाच संघ ठरला. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या पहिल्या सामन्यापासून चेन्नईने आयपीएलची सुरुवात केली होती आणि आता मुंबईविरुद्ध त्यांनी आपला २००वा सामना नोंदवला.
चेन्नईपुर्वी मुंबई इंडियन्सने हा कारनामा केला होता. हा त्यांचा आयपीएलमधील २१९वा सामना होता. तर आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने २०६ सामने आणि कोलकाता नाईट रायडर्सने २०४ सामने खेळले आहेत. या चार संघांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाला अद्याप हा पराक्रम करत आलेला नाही.
युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला त्यांचे आयपीएलमधील २०० सामने पूर्ण करण्यासाठी अजून ५ सामन्यांची गजर आहे. तर किंग्स इलेव्हन पंजाबने आतापर्यंत १९१, राजस्थान रॉयल्सने १६५ आणि सनरायझर्स हैदराबादने १२४ सामने खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘जिंकणारा संघ नव्हे हा तर वृद्ध कल्याण केंद्र’, माजी क्रिकेटरची सीएसकेवर बोचरी टीका
चेन्नई विरुद्ध रोहित संघाबाहेर, ‘हा’ खेळाडू करणार संघाचे नेतृत्त्व
ट्रेंडिंग लेख-
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!