टी20 विश्वचषक 2024 मध्ये चाहत्यांना आज (15 जून) दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात दोन्ही संघ एकमेकांशी शेवटपर्यंत झुंजत होते, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेनं 1 धावेनं रोमहर्षक विजय मिळवला.
टी20 विश्वचषकात कोणत्याही संघानं एका धावेनं विजय मिळवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 5 वेळा असा कारनामा घडला आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला टी20 विश्वचषकातील अशा 5 सामन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यात संघानं एका धावेनं विजय मिळवला.
(5) दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड, 2009
2009 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 128 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 127 धावांपर्यंत मजल मारू शकला आणि आफ्रिकेनं सामना एका धावेनं जिंकला.
(4) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2012
2012 च्या टी20 विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा सामना खेळला गेला होता. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 152 धावा केल्या. प्रत्युत्तरात, आफ्रिकन संघ लक्ष्याच्या अगदी जवळ आला, परंतु ते 151 धावाच करू शकले. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेनं सामना एका धावानं गमावला.
(3) भारत विरुद्ध बांग्लदेश, 2016
2016 च्या टी20 विश्वचषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात अत्यंत रोमांचक सामना झाला होता. सामन्यात कधी भारताचं पारडं जड वाटत होतं, तर कधी बांग्लादेशचा संघ वरचढ वाटत होता. या सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 146 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, बांग्लादेशचा संघ विजयाच्या समीप येऊनही अपयशी ठरला. बांग्लादेशनं 20 षटकांत 9 गडी गमावून 145 धावा केल्या आणि भारतानं हा रोमांचक सामना एका धावेनं जिंकला.
(2) झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान, 2022
या सामन्याला टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक म्हटलं जातं. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेनं 8 गडी गमावून 130 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसमोर सपशेल अपयशी ठरला आणि 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 129 धावाच करू शकला.
(1) दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ, 2024
या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात झालेल सामना लो स्कोअरिंग होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाला 20 षटकात 7 गडी गमावून केवळ 115 धावाच करता आल्या. या सामन्यात नेपाळचा वरचष्मा दिसत होता. मात्र आफ्रिकन गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत नेपाळला लक्ष्य गाठण्यापासून एका धावेनं रोखलं. नेपाळच्या संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 114 धावाच करता आल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
नेपाळचा हार्टब्रेक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या एका धावेनं पराभव
‘कुदरत का निजाम’ पुन्हा एकदा अपयशी! पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम मोक्याच्या क्षणी नेहमीच होतो फ्लॉप
टी20 विश्वचषकातून बाद होताच सौरभ नेत्रावळकरनं उडवली पाकिस्तानची खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल