आयपीएलच्या 13 व्या हंगामात मंगळवारी (13 ऑक्टोबर) दुबई येथे झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबादचा 20 धावांनी पराभव केला. या आयपीएल हंगामात खेळलेल्या 8 सामन्यापैकी हा चेन्नईचा हा तिसरा विजय आहे. सनरायझर्स हैदराबादचा हा 5 वा पराभव आहे. हा सामना चेन्नईने जिंकला असला तरी सामन्यानंतर धोनी चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
झाले असे की हैदराबादचा संघ चेन्नईने दिलेल्या 168 धावांचा पाठलाग करत असताना 19 वे षटक चेन्नईकडून वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर टाकत होता. त्याने षटकातील दुसरा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्नात वाईडच्या रेषेबाहेर टाकला. पण मैदानावरील पंच पॉल रेफेल वाईडचा निर्णय देत असतानाच धोनी आणि शार्दूल यांनी हातवारे करून विरोध केला. धोनी आणि शार्दूलने केलेला विरोध पाहून पंचानी वाईड चेंडू असा निर्णय देण्यासाठी वर घेतलेला हात पुन्हा खाली घेतला आणि तो चेंडू वाईड असल्याचा निर्णय दिला नाही. पंचाच्या त्या वादग्रस्त निर्णयाविरुद्ध आणि धोनीच्या हावभावांविरुद्ध चाहत्यांनी ट्विटरवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे.
https://twitter.com/ac89_tweets/status/1316087323302547457
#IPL2020 #Dream11IPL #SRHvCSK #dhoni #Umpire #warner pic.twitter.com/O48kaJXi6u
— Viraj B. (@VirajB1) October 13, 2020
https://twitter.com/BaliKanav/status/1316071428626608129?s=20
https://twitter.com/tejas_pujare/status/1316071319990132736?s=20
Poor decision from the umpire! Can't change it after Dhoni shouts at him #SRHvCSK
— criKvoice (@crikvoice) October 13, 2020
So dhoni shouted and Paul Reifel didn't call wide. Umpiring just at another level. Can't even explain. #IPL2020 #SRHvCSK
— Vishesh Roy (@VisheshRoy20) October 13, 2020
That's staggering. Clear wide, Reiffel about to give a wide, Dhoni and Shardul protest so he decides not to give a wide.
The ball was way wide!
In fact he should have reprimanded Shardul for his reaction.
Abysmal umpiring.#SRHvCSK— Pravir Singh (@Pravir21) October 13, 2020
Today CSKs fair play will get a boost for Thala scaring the umpire.
— arfan (@Im__Arfan) October 13, 2020
Reply clearly showed umpire was going to call wide then the reaction from MS came and he stopped it. pic.twitter.com/3ChKRV7dmC
— Johns. (@CricCrazyJohns) October 13, 2020
याआधीही धोनी आणि पंचांचे आयपीएलदरम्यान मैदानात वाद झाले आहेेत. मागीलवर्षी राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यातही धोनी ड्रेसिंग रुममधून पंचांच्या निर्णयाविरुद्ध विरोध दर्शवण्यासाठी थेट मैदानात आला होता. या प्रकरणाबद्दल त्याच्यावर दंडाची कारवाईही झाली होती.
CAPTAIN Cool They Said
CAPTAIN Umpire They Never Said pic.twitter.com/SUshJoXL3e— 82* (@White___Devil18) October 13, 2020
Wait, did Reifel just reverse his decision there?
— Snehal Pradhan (@SnehalPradhan) October 13, 2020
या सामन्यात चेन्नई प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 167 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून अंबाती रायुडूने 34 चेंडूत 41 धावांची शानदार खेळी खेळली तर शेन वॉटसननेही 38 चेंडूत, 42 धावा केल्या. शेवटी, रवींद्र जडेजाने 10 चेंडूत 25 धावांचा तुफानी डाव खेळत संघाला 167 ही धावसंख्या गाठण्यास मदत केली. या सामन्यात चेन्नईकडून युवा फलंदाज सॅम करनला सलामीसाठी पाठविण्यात आले होते आणि त्यानेही नाराज न करता 21 चेंडूत 31 धावा केल्या.
168 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला हैदराबादचा संघ अनुभवी फलंदाज केन विल्यमसनच्या 57 धावांच्या खेळीनंतरही केवळ 8 बाद 147 धावाच करू शकला.
चेन्नईचा पुढील सामना 17 ऑक्टोबरला शारजाह येथे दिल्ली कॅपिटल्स संघा विरुद्ध होणार आहे. तर हैदराबादचा सामना 18 ऑक्टोबरला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
राफेल नदालचे फ्रेंच ओपन जिंकणे झाले महाकठीण, राजस्थानचा फिरकीपटू देणार फाईट
चेन्नई एक्सप्रेस पुन्हा रुळावर, हैदराबाद विरुद्धच्या विजयासह गुणतालिकेत आली ‘या’ स्थानावर
मै अब बच्चा नहीं रहा..! हैदराबाद विरुद्ध ओपनिंग करणे सॅम करन पडले महागात
ट्रेंडिंग लेख-
IPL : पंजाबकडून शतक करणारे ३ खेळाडू, जे आज कोणाच्या लक्षातही नाहीत
आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू
स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू