इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर आता खेळाडूंचे लक्ष आयपीएल २०२१ च्या उर्वरित सामन्यांकडे लागलेले आहे.
कसोटी मालिकेतील पाचवा सामना संपल्यानंतर बीसीसीआय चार्टर्ड विमानाची व्यवस्था करणार होते. मात्र, पाचवा सामना रद्द झाल्यानंतर परिस्थिती बदलली आहे. आता खेळाडू व्यावसायिक विमानाने यूएईला आयपीएलसाठी रवाना होणार आहेत आणि तेथे जाऊन पहिले साहा दिवस विलगीकरणात राहणार आहेत. आयपीएल २०२१चे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळले जाणार आहेत.
एएनआयने दिलेल्या माहितीप्रमाणे राॅयल चॅलेंजर्स बेंगलोरचा संघ रविवारी चार्टर्ड विमानाने कर्णधार विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना मँचेस्टरमधून यूएईमध्ये आणणार आहे. तसेच मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि अन्य खेळाडू शनिवारी(११ सप्टेंबर) मँचेस्टरमधून यूएईला रवाना होणार आहेत.
चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघ पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांतील त्यांच्या खेळाडूंना व्यावसायिक विमानांने यूएईमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी बीसीसीआयने इंग्लंविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात सहभागी झालेल्या खेळाडूंना १५ सप्टेंबरला यूएईमध्ये आणण्यासाठी चार्टर्ड विमानाची नियोजन केले होते.
पण, त्यापूर्वीच भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर पाचवा सामना रद्द करण्यात आला आहे. खेळाडू सामना रद्द झाल्यानंतर आता यूएईला रवाना होणार आहेत.
रोहित शर्माव्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव त्यांच्या कुटुंबांसोबत मँचेस्टरमधून यूएईला रवाना होणार आहेत.
आयपीएलशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की पाचवा कसोटी सामना रद्द झाल्यानंतर बीसीसीआय कोणत्या चार्टर्ड विमानाची व्यवस्था नाही करणार. त्यामुळे प्रत्येक फ्रेंचायझीला त्यांच्या-त्यांच्या खेळाडूच्या प्रवासाची व्यवस्था करावी लागणार आहे. ते सगळे व्यावसायिक विमानाचा वापर करणार असल्यामुळे त्यांना सहा दिवसांच्या विलगीकरणार राहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भारत-इंग्लंड संघामधील कसोटी सामना पुन्हा कधी खेळवला जाऊ शकतो? वाचा सविस्तर
मँचेस्टर कसोटी रद्द होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंना व्हॉट्सऍपवर नक्की काय आले होते मेसेज?
भारतीय संघाकडून अशा कोणच्या ३ चूका घडल्या, ज्यामुळे पाचवा कसोटी सामना झाला रद्द