भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. यात लाखो लोक रोज अडकताना दिसत आहेत. यात अनेक क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णामुर्तीच्या कुटुंबावरही मोठे दु:ख कोसळले. तिच्या आईचे आणि बहिणीचे २ आठवड्यांच्या अंतराने काहीदिवसांपूर्वी निधन झाले.आता जय शाह आणि बीसीसीआयने विचारपूस करत तिला सांत्वना दिली आहे. त्यामुळे ट्विट करत त्यांचे आभार मानले आहेत.
काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरने, बीसीसीआयवर कठीण काळात खेळाडूंची विचारपूस न करण्याचे गंभीर आरोप केले होते.
त्यांनंतर वेदाने ट्विट करत जय शाह आणि बीसीसीआयचे आभार मानले आहेत. तिने आपल्या ट्विट मध्ये लिहिले की,” शेवटचा महिना माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. मी काही दिवसांपूर्वी माझ्याशी संपर्क साधल्याबद्दल बीसीसीआय आणि जय शाह यांचे आभार मानू इच्छिते. या कठीण काळात त्यांनी मला साथ दिली. मनापासून धन्यवाद. ”
Have been tough last month for me and family and I’d like to sincerely thank the @BCCI & Mr @jayshah sir for calling me few days back and extending support in these unprecedented times. Many thanks sir @BCCIWomen
— Veda Krishnamurthy (@vedakmurthy08) May 18, 2021
येत्या जून महिन्यात भारतीय महिला संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात बीसीसीआयने कसोटी आणि वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली होती. या संघात वेदा कृष्णामूर्तीला स्थान देण्यात आले नव्हते. त्यानंतर ऑस्ट्रेलियन महिला संघाची माजी कर्णधार, लिसाने ट्विट करत बीसीसीआय वर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले होते.
तिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, “आगामी मालिकांसाठी वेदाची निवड करण्यात आलेली नाही. कदाचीत त्यांच्या दृष्टीने ही योग्य गोष्ट असेल. पण राग येण्यासारखी गोष्ट अशी की ती करारबद्ध खेळाडू असताना बीसीसीआयने तिच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. बीसीसीआयने ती सध्या कोणत्या गोष्टींचा सामना करत आहे, याचीही विचारपूस केलेली नाही.”
तसेच ती पुढे म्हणाली होती की, “एक चांगल्या असोसिएशनने खेळाडूंची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला हवी. त्यांनी कशाचीही पर्वा न करता केवळ सामन्यांवरच लक्ष देऊ नये. ही गोष्ट खूप निराशाजनक आहे. माजी खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन प्रत्येक दिवशी आमच्याशी संपर्क साधत आमची चौकशी करत असतात. भारतात जर खेळाडूंच्या असोसिएशनची गरज असेल तर त्यासाठी योग्य वेळ हीच आहे. या साथीच्या रोगाच्या काळात अनेक खेळाडू दबाव, चिंता, भीती आणि दु:ख अशा भावना अनुभवत असतील. ज्याचा परिणाम त्यांच्यावर वैयक्तिकरित्या होऊ शकतो आणि परिणामत: खेळावर ही परिणाम होऊ शकतो.”
There is still time to fix this!! pic.twitter.com/LT3hApMioJ
— Lisa Sthalekar (@sthalekar93) May 15, 2021
वेदाची कामगिरी
वेदाही भारतीय महिला संघाची नियमित सदस्य आहे. तिने २०११ साली भारतीय संघात पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत ४८ वनडे आणि ७६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. वनडेमध्ये तिने ८२९ धावा केल्या. तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये तिने ८७५ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘युनिव्हर्स बॉस’ची बातच न्यारी! गेलने चक्क समुद्रात मारले पुशअप्स, व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल