माजी भारतीय क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) आज (१८ जानेवारी) आपला ५० वा वाढदिवस (Vinod Kambli’s 50th Birthday) साजरा करत आहे. या खास दिनी चाहत्यांपासून आजी-माजी क्रिकेटपटूंपर्यंत सर्वांनी कांबळींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अशात कांबळींचा जिवलग मित्र आणि माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यानेही त्याला गमतीशीर पद्धतीने शुभेच्छा (Sachin Tendulkar Wished Vinod Kambli) दिल्या आहेत.
सचिनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कांबळीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्याने कांबळीसोबतचा आपला एक बालपणीचा फोटो शेअर केला आहे आणि एक सध्याचा फोटो जोडला आहे. या फोटोंवर कॅप्शन देत त्यावे लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा कांबल्या! तुझ्यासोबतच्या मैदानावरील आणि मैदानाबाहेरील असंख्य आठवणी मी आयुष्यभर जपत राहीन. वयाच्या पन्नाशीत पोहोचल्यानंतर तुला कसे वाटते आहे, हे ऐकण्यास मी उत्सुक आहे.’
https://www.instagram.com/p/CY3K6mclvTQ/?utm_source=ig_web_copy_link
सचिन-कांबळीची विश्वविक्रमी भागिदारी
कांबळी आणि सचिनने अगदी शालेय स्तरापासून एकत्र क्रिकेट खेळले आहे. आजही या जोडीच्या विश्वविक्रमी ६६४ धावांच्या भागिदारीची आठवण काढली जाते. फेब्रुवारी १९८८ मध्ये हॅरिस शिल्ड या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत शारदाश्रम विद्यामंदिर संघाकडून त्यांनी ही मॅरेथॉम भागिदारी रचली होती. सेंट झेवियर हायस्कूलविरोधात स्पर्धेतील उपांत्य सामना खेळताना त्यांनी ही भागिदारी केली होती.
व्हिडिओ पाहा- क्रिकेटर्सलाही मागे सोडत ‘हे’ अंपायर कमावतात चिक्कार पैसा
विनोद कांबळींची कारकिर्द
कांबळीच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीवर नजर टाकायची झाल्यास, त्याने पाकिस्तानविरुद्ध ऑक्टोबर १९९१ मध्ये पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु त्याला अधिक वर्षे भारतीय संघाचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली नाही. केवळ १० वर्षे तो भारतीय संघाकडून खेळू शकला. यादरम्यान त्याने १०४ वनडे सामने खेळताना ३२ च्या सरासरीने २४७७ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतकेही आली होती.
तसेच १७ कसोटी सामन्यांमध्ये २ द्विशतके आणि ४ शतकांच्या मदतीने त्याने १०८४ धावा केल्या होत्या. पुढे वर्ष २००० नंतर त्याला भारतीय संघात जागा मिळाली नाही. त्यामुळे अखेर २००९ साली त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर आपल्या क्रिकेट कारकिर्दीचा अखेर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल न खेळता ‘हे’ ३ क्रिकेटपटू करू शकतात भारतीय संघात पदार्पण
रोहितनंतर खुद्द सिनियर शर्माजींची मैदानावर जोरदार फटकेबाजी, वडिलांच्या फलंदाजीवर ‘हिटमॅन’ही फिदा
“विराट आणि शास्त्री यांनी धोनीला कसोटी कर्णधारपद सोडण्यासाठी भाग पाडले”
हेही पाहा-