टोकियोमध्ये सध्या पॅरालिम्पिक स्पर्धा सुरु आहे. यास्पर्धेत भारतीय खेळाडूंचे आत्तापर्यंत उत्तम प्रदर्शन झाले आहे. रविवारी (२९ ऑगस्ट) या स्पर्धेत थाळीफेक एफ५२ स्पर्धेत भारताच्या ४१ वर्षीय विनोद कुमारने कांस्यपदक जिंकले होते. मात्र, आता त्याचे हे कांस्यपदक काढून घेण्यात आले आहे. अपंगत्व वर्गीकरणात अयोग्य ठरल्याने त्याचे कांस्यपदक काढून टाकण्यात आले आहे.
एफ५२ स्पर्धेत तेच खेळाडू सहभाग घेतात, ज्यांच्या मांसपेशींची क्षमता कमजोर असते आणि त्यांची हलचाल मर्यादीत असते, हातांमध्ये अपंगत्व असते किंवा पायात अपंगत्व असते, ज्यामुळे खेळाडू बसून स्पर्धेत भाग घेतात. आयोजकांकडून २२ ऑगस्ट रोजी विनोदला पात्र ठरवण्यात आले होते. पण, त्याच्या पात्रतेवर आव्हान देण्यात आले होते. त्यानंतर त्याचे कांस्यपदक होल्डवर ठेवण्यात आले होते.
त्याच्याबाबतीत आयोजकांकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की “पॅनेलला आढळले की एनपीसी (राष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती) भारताचे खेळाडू विनोद कुमार यांना ‘स्पोर्ट क्लास’ देऊ शकत नाही आणि त्यामुळे खेळाडूला पात्रता पूर्ण केले नसल्याचे ठरवण्यात आले आहे.’
पुढे म्हटले आहे की ‘याचमुळे पुरुषांच्या एफ५२ थाळी फेक स्पर्धेसाठी विनोद अयोग्य ठरले असून स्पर्धेतील त्याचा निकाल अमान्य होत आहे.’
41 वर्षीय विनोद बीएसएफ जवान आहे. त्याचे वडील 1971 च्या भारत-पाक युद्धात लढले होते, त्यानी या स्पर्धेत 19.91 मीटरची सर्वोत्तम थाळी फेक केली होती आणि पोलंडच्या पिओटर कोसेविच (20.02 मीटर) व क्रोएशियाच्या वेलीमीर सॅंडर (19.98 मीटर) यांच्यानंतर तिसरे स्थान पटकावले होते.
विनोद सुरुवातीपासूनच चांगल्या स्थितीत होता आणि त्याने पहिल्या प्रयत्नात 17.46 मीटर थ्रो फेकला. यानंतर, विनोदने दुसऱ्या प्रयत्नात आणखी चांगले प्रयत्न केला आणि 18.32 मीटर थाळी फेकली. चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात 19.20 मीटर आणि 19.91 मीटर दूर थाळी फेकली. विनोदच्या पाचव्या थाळी फेकीनंतर त्याचे कांस्यपदक निश्चित झाले होते. विनोदने 19.91 मीटर थाळी फेकून आशियाई विक्रमही मोडला होता. मात्र, आता हा निकाल अमान्य करण्यात आला आहे.
पॅरालिम्पिकमध्ये खेळाडूंचे वर्गीकरण त्यांच्या अपंगत्वाच्या प्रकार आणि व्याप्तीनुसार केले जाते.
भारताने या स्पर्धेत आत्तापर्यंत २ सुवर्ण, ४ रौप्य आणि १ कांस्यपदक जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मयंती लँगरने पती स्टुअर्ट बिन्नीचा ‘तो’ फोटो शेअर करत चाहत्यांना टाकले गोंधळात
रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखाली खेळणार का? श्रेयस अय्यरने दिले ‘असे’ उत्तर
अबुधाबीतील मोठी स्पर्धा गाजवताना दिसणार डू प्लेसिस; ‘या’ संघाचा बनला आयकॉन आणि कर्णधार