आयपीएल २०२०साठी तयार करण्यात आलेल्या जैव-सुरक्षित प्रोटोकॉलला तोडणे क्रिकेटपटूंबरोबरच सपोर्ट स्टाफ आणि फ्रंचायझी सदस्यांना चांगलेच महागात पडणार आहे. प्रशासक समितीने अशी शिफारस केली आहे की, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करणे समस्यांना आमंत्रण दिल्यासारखे होईल. कठोर दंड निश्चित केला पाहिजे. सर्व सदस्यांनी सहमती दर्शवत आचारसंहिता आणि उल्लंघन केल्याबद्दल विविध दंड लावण्याबाबत चर्चा केली आहे.
न्यायालयात जाऊ शकते समिती
बोर्डाच्या आचारसंहितेनुसार, आयपीएल ७ आठवड्यांसाठी निश्चित केले आहे. परंतु यावेळी आयपीएल २०२०साठी ५३ दिवसांची मंजूरी दिली आहे. जेव्हा हा मुद्दा उद्भवला, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी घेण्याबद्दल चर्चा झाली, ज्यामुळे नंतर कोणतेही कायदेशीर अडथळे निर्माण होणार नाहीत.
आधी मुंबई सहित ६ शहरांमध्ये होणार होते आयपीएलचे आयोजन
आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी स्पष्ट केले की, आधी मुंबई, बंगळुरू, चेन्नई, अहमदाबाद, बडोदा, राजकोट अशा ६ शहरांमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात येणार होते. परंतु क्रीडाविषयक क्रियाकलापांसाठी गृह मंत्रालयाची कोणतीही मंजुरी मिळाली नव्हती आणि यातील काही शहरांमध्ये नंतर कोरोनाची परिस्थिती बिकट होऊ लागली.
आयपीएल २०२०चे आयोजन १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये होणार आहे, तर आयपीएलचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
३३ वर्षीय मॉर्गनने वाढवले रुटचे टेन्शन, आता मोठा विक्रमही धोक्यात
३ वनडेत ८ चेंडू खेळून १ धाव करत ३ वेळा बाद होण्याचा कारनामा केलाय या खेळाडूने
दरवर्षीप्रमाणेचं एवढे दिवस गायब झालेल्या धोनीचे सीएसकेच्या चाहत्यांना खास गिफ्ट, पहा काय आहे…
ट्रेंडिंग लेख –
कॅप्टन्सीची एकही संधी न मिळता सर्वाधिक कसोटी सामन्यात टीम इंडियाची सेवा करणारे ३ दिग्गज
सध्याच्या टीम इंडियाचे ३ मुख्य शिलेदार, ज्यांनी एकाही सामन्यात केली नाही कॅप्टन्सी
कोणताच क्रिकेटचाहता विसरू शकणार नाही असा झिम्बाब्वेचा नील जॉन्सन