आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी (२४ सप्टेंबर) एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) आणि विराट कोहलीच्या नेतृत्वातील राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) या संघांचा आमना सामना झाला. या सामन्यात धोनीच्या सीएसकेने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यादरम्यान विराट आणि धोनी यांच्यातील घट्ट नाते जगसमोर आले आहे.
आरसीबीचा सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट धोनीजवळ गेला आणि त्याला मागून पकडले. या दोघांचा हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. चहतेही त्यांच्या या बाॅंन्डिंगविषयी प्रतिक्रिया देत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सामना संपल्यानंतर धोनी त्याच्या संघातील खेळाडूंसोबत सीमारेषेजवळ उभा राहून चर्चा करत आहे. तेवढ्यात आरसीबीचा कर्णधार विराट तेथे येतो आणि धोनीला पाठीमागून पकडतो आहे. नेटकऱ्यांना या दोघांमधील बाॅन्डिंग पाहायला मिळाली असून ती त्यांना आवडलेली दिसत आहे.
🥺🥺🥺😭😭this video has brought a big smile on my face..!!!
Virat yaar 😭😭😂😂🤣I genuinely love this bond♥️😍
God please always protect this bond🧿🧿♥️#Mahirat #viratkholi #Dhoni
pic.twitter.com/EIyc1UogeQ— ❥𝐑𝐈𝐘𝐀✧*🕊️ (@riyu_14) September 24, 2021
शुक्रवारीच विराट आणि धोनी दोघे सामना सुरु होण्याआधीही एकमेकांसोबत चर्चा करताना दिसले होते. या सामन्यात सीएसकेने आरसीबीला मात दिली असून संघ आयपीएलच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तसेच सीएसके पहिल्या क्रमांकावर आल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावार घसरली होती. विराटचा आरसीबी संघ सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.
MSDian Virat Kohli Hugging @MSDhoni after the match..❤ pic.twitter.com/Va27QDpn8w
— Dhoni Army TN™ (@DhoniArmyTN) September 24, 2021
You can't end CSK vs RCB match without Kohli – Dhoni moment. pic.twitter.com/IlCjzlMSnP
— Johns. (@CricCrazyJohns) September 24, 2021
दरम्यान, शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकली होती आणि आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. सलामीवीर विराट आणि देवदत्त पडिक्कलने १११ धावांची भागीदारी करत आरसीबीला चांगली सुरुवात दिली होती. पण संघ अपेक्षेप्रमाणे धावसंख्या करू शकला नाही. आरसीबीने २० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर १५६ धावा केल्या होत्या. चेन्नईचा गोलंदाज ड्वेन ब्रावोने ३ आणि शार्दुल ठाकुरने २ विकेट्स मिळवल्या. चेन्नईने १५७ धावांचे आव्हान १८.१ षटकात चार विकेट्सच्या नुकसानासह गाठले. सीएसकेच्या ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक ३८ आणि अंबाती रायडूने ३२ धावांची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
रेकॉर्ड अलर्ट! फिरकीपटू अश्विनच्या टी२०तील २५० विकेट्स पूर्ण, आता फक्त ‘ते’ दोघे भारतीय पुढे
दुर्देवचं म्हणावे, नाही का? त्यागीच्या चेंडूवर धवनने स्वत:च घेतली स्वत:ची विकेट, बघा नेमकं काय झालं
सॅमसन विकेटकिंपिग मोड ऑन! तडखाफडखी हात चालवत अय्यरला केले यष्टीचीत, फलंदाजही बुचकळ्यात