भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली हा धावा काढण्याबरोबर एक उत्तम क्षेत्ररक्षकही आहे, मात्र बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. भारतीय संघ जेव्हा विकेटसाठी आतुर होता, तेव्हा विराटने सोपा झेल सोडला. चिंता करण्याचे काही कारण नाही, जो झेल विराटने सोडला होता तो रिषभ पंतने पुढच्याच प्रयत्नात पकडला. या उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
भारताचा संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, ज्यामध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. यातील पहिला सामना 14 डिसेंबरपासून चट्टोग्राम येथे खेळला जात आहे. ज्यामध्ये भारताने बांगलादेशसमोर जिंकण्यासाठी 513 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
Catch 🔥🔥 @RishabhPant17#INDvBAN #IndianCricketTeam #RP17 pic.twitter.com/KA4SIGNuLv
— Rishabh Trends™ (@TrendRishabh) December 17, 2022
झाले असे की, चौथ्या दिवशी भारताचा संघ विकेटच्या शोधात होता. त्यातच उमेश यादव याच्या गोलंदाजीवर विराट कोहली याने नजमुल शांतो याचा झेल सोडला. हा प्रकार 47व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर घडला. तो चेंडू फलंदाजाच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. जेथे विराट उभा होता. त्याचे चेंडूवर लक्ष होते, मात्र चेंडू त्याच्या हातात आला नाही. तसेच त्याच्या थोडे दूर विकेटकीपर रिषभ पंत उभा होता, ज्याने विराटने सोडलेला झेल एका क्षणाचाही विलंब न लावला उत्तमरित्या पकडला. यावेळी त्याच्या विकेटकीपिंगचा उत्तम नमुना पाहायला मिळाला. याआधी त्याने या सामन्यात भारताच्या पहिल्या डावात चांगली फलंदाजी देखील केली आहे.
A solid relay catch to break the solid partnership 🤯#TeamIndia gets the much-needed breakthrough courtesy of brilliant reflexes from @RishabhPant17 🙌#SonySportsNetwork #BANvIND@imVkohli pic.twitter.com/nbSfoMvhzd
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) December 17, 2022
या सामन्यात बांगलादेशच्या सलामीजोडीने इतिहास रचला. त्यांनी पहिल्यांदाच भारताविरुद्ध कसोटीत शतकीय भागीदारी केली. शांतो आणि झाकीर हसन यांनी पहिल्या विकेटसाठी 277 चेंडूत 124 धावांची भागीदारी केली. शांतो 67 धावा करत बाद झाला, नंतरही हसन खेळपट्टीवर टीकून होता. त्याने शतकी खेळी केली. या दरम्यान त्याने लिटन दास याच्यासोबतही महत्वपूर्ण भागीदारी केली. हसन-दास जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागीदारी केली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शतक करूनसुद्धा दुसऱ्या कसोटीतून शुबमन गिल होणार बाहेर! भारताच्या दिग्गजाचे खळबळजनक वक्तव्य
आयपीएलमध्ये या ‘5’ बॉलर्सवर पडणार पैशांचा पाऊस, यादीत फक्त एकच भारतीय