शुक्रवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यात चेन्नईने ६ विकेट्स राखूर विजय मिळवला आहे. आरसीबीने सामना गमावला असला तरी कर्णधार विराट कोहलीचे पूर्ण सामन्यातील प्रदर्शन पाहण्यसारखे होते. त्याने प्रथम फलंदाजी करताना संघासाठी महत्वाची खेळी केली आणि गोलंदाजीवेळीही चांगले क्षेत्ररक्षण केले. त्याने क्षेत्ररक्षण करताना एक अप्रतिम झेल घेतली, ज्यामुळे विराटने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
विराट मागच्या काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खराब फाॅर्ममध्ये दिसला आहे. मात्र, त्याने सीएसकेविरुद्धच्या सामन्यात चांगली फलंदाजी केलेली पाहायला मिळाली. सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल (७०) यांनी १११ धावांची मोठी भागीदारी रचली होती. यामध्ये विराटने ४१ चेंडूत ५३ धावा जोडल्या होत्या. सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली असली तरीही आरसीबी संघ केवळ १५७ धावा करू शकला.
त्यानंतर सीएसकेची फलंदाजी सुरू असताना क्षेत्ररक्षण करतेवेळी विराटच्या फिटनेसची एक झलक पाहायला मिळाली. सीएसकेचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. सलामीवीर ऋतुराज आणि डू प्लेसिस यांनी ७१ धावांची भागीदारी रचली होती आणि संघ चांगल्या स्थितीत पोहोचला होता.
यानंतर आरसीबीचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल डावातील नववे षटक टाकण्यासाठी आला होता. त्याच्या या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर ऋतुराज बाद झाला. ऋतुराज या चेंडूवर ड्राईव मारण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू त्याच्या बॅटच्या कोपऱ्यावर लागून विराटच्या हातात गेला. विराटनेही अप्रतिम डाईव्ह मारून अवघड झेल पकडला. दुरुन पाहिल्यानंतर विराटने चेंडू पकडण्यापूर्वी चेंडूने मैदानाला स्पर्श केला असावा असे भासत होते. परंतु त्याने तत्पूर्वीच अचूक झेल टिपला होता.
https://twitter.com/kingofthecric/status/1441611110486986758?s=20
Close enough, just Virat Kohli being Virat Kohli on the field, wt a spectacular catch.@imVkohli#CSKvsRCB #rcb #RCBvsCSK pic.twitter.com/HJgy7sFLAf
— THE PHENOMENAL™ (@Phenomenal__P_) September 24, 2021
What a catch by Virat Kohli to dismiss Ruturaj Gaikwad. Excellently taken, CSK first down now. pic.twitter.com/FUqeoUPZFc
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 24, 2021
असे असले तरीही सीएसकेने या सामन्यात केवळ ४ विकेट्स गमावत आणि १८.१ षटकात हा सामना जिंकला आहे. कर्णधार धोनी आणि सुरेश रैना डावाखेर नाबाद राहिले. या सामन्यानंतर सध्या आयपीएलच्या गुणतालिकेत आरसीबी संघ तिसऱ्या आणि सीएसकेचा संघ पुन्हा पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-