दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात शुक्रवारी (२१ जानेवारी) वनडे मालिकेतील दुसरा सामना (Second ODI) झाला. बोलँड पार्क येथे झालेल्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) खातेही न खोलता पव्हेलियनला परतला. दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटू केशव महाराजने कर्णधार टेम्बा बावुमाच्या हातून त्याला झेलबाद केले. अशाप्रकारे शून्यावर आपली विकेट विराटने बरेचसे नको असलेले विक्रम (Virat Kohli’s Duck Records) आपल्या नावावर केले आहेत.
विराटची ही वनडे क्रिकेटमध्ये खाते न खोलता शून्यावर बाद होण्याची १४ वी वेळ होती. यापूर्वी तो शेवटचा २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शून्यावर बाद झाला होता. त्यावेळी तो दोन चेंडूंवरच आपली विकेट गमावून बसला होता. यासह त्याने रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर बाद होण्याच्या विक्रमात मागे सोडले आहे. हे दोन्ही क्रिकेटर वनडे क्रिकेटमध्ये प्रत्येकी १३ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
व्हिडिओ पाहा- अभ्यासू कीडा असलेला Axar Patel फक्त आज्जीमुळे बनला क्रिकेटर
तसेच मागील ३ वर्षांपासून शतकाची अपेक्षा असलेल्या विराटची ही दक्षिण आफ्रिकेत वनडेत शून्य धावा करण्याची दुसरी वेळ होती. यापूर्वी २०१३ मधील वनडे मालिकेत त्याने शून्यावर आपली विकेट गमावली होती. त्यातही रोमांचक गोष्ट म्हणजे, तो सामनाही मालिकेतील दिसराच वनडे सामना होता आणि विराट पाच चेंडूंचा सामना करून शून्यावर विकेट गमावून बसला होता.
सर्वाधिक डकमध्ये (शून्यावर बाद होणे) सेहवागची बरोबरी
या विकेटसह विराट तिन्ही स्वरूपात भारताकडून सर्वाधिकवेळा शून्यावर होणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. तो ३१ वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यावर विकेट गमावून बसला आले. याबाबतीत त्याने माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागची बरोबरी केली आहे. तोही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३१ वेळा शून्यावर बाद झाला होता. या विक्रमात अव्वलस्थानी सचिन तेंडूलकर आहे, जो ३४ वेळा शून्यावर आपली विकेट गमावून बसला आहे.
याखेरीज वनडे क्रिकेटमध्ये १-७ या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक डक नोंदवण्याच्या विक्रमातही विराटने सेहवागची बरोबरी केली आहे. सेहवागबरोबरच विराट सुरेश रैनासोबतही बरोबरीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! बीसीसीआयमध्ये नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक
रिषभ पंत, केएल राहुल यावर्षी होणार मालामाल? बीसीसीआयच्या वार्षिक करारात होऊ शकतो ‘हा’ फायदा
विश्वास बसणार नाही; टीम इंडियात पडलेत दोन गट? ‘विराट आणि राहुल जवळही बसत नाही’
हेही पाहा-