भारतीय संघाने गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या तीनही प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठ मोठ्या सामन्यात विजय मिळवला आहे. परंतु, भारतीय संघाला आयसीसीच्या स्पर्धेत विजय मिळवण्यात अपयश आले आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत कर्णधार विराट कोहलीला आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची सुवर्ण संधी होती. परंतु, ही देखील संधी त्याने गमावली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावर आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
अनेकदा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मर्यादित षटकांच उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात तुलना केली गेली आहे. अनेकांनी असे ही म्हटले होते की, विराटने भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माच्या हाती द्यावे. माजी भारतीय यष्टिरक्षक फलंदाज किरण मोरे यांनीही म्हटले होते की “आता वेळ आली आहे, रोहित शर्माला नेतृत्वपद देण्याची.”(Virat Kohli will handover captaincy to Rohit Sharma, kiran more prediction after world test championship final)
आयसीसीच्या स्पर्धांमध्ये विराट कोहली फ्लॉप
विराट कोहलीला कर्णधार म्हणून आपल्या कारकीर्दीत आत्तापर्यंत आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाहीये.यावेळी विराटकडे उत्तम संधी होती परंतु,त्याला या संधीचे सोने करता आले नाही.हे पहिल्यांदा होत नाहीये, की विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचल्यानंतर पराभूत झाला आहे.
यापूर्वी देखील २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाने पराभूत केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यातही भारतीय संघाला न्यूझीलंड संघाने पराभूत केले होते.
काय म्हणाले होते किरण मोरे?
किरण मोरे यांनी भविष्यवाणी करत म्हटले होते की,”मला विश्वास आहे की, रोहित शर्माला लवकरच भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. विराट कोहली आणखी किती दिवस वनडे आणि टी -२० मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. जेव्हा भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरून परतेल तेव्हा या विषयी निर्णय घाव्या लागेल. तसेच या विषयावर चर्चा ही होऊ शकते. ”
महत्वाच्या बातम्या –
कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात वॅटलिंगने अव्वल यष्टीरक्षक धोनीला पछाडलं, मोडला ‘हा’ विक्रम
सुवर्णसंधी गमावली! WTC अंतिम सामन्यातील पराभवामुळे भारतीय संघाचे ‘इथे’ही मोठे नुकसान
मैदानातील वैर विसरुन विजेता संघनायक केनने विराटला मारली मिठी, भारतीय चाहत्यांकडून भरभरुन कौतुक