राजकोट | भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने शानदार नाबाद शतक केले आहे. १८४ चेंडूंचा सामना करताना विराटने हे शतक केले. त्याच्या शतकी खेळीत ७ चौकांराचा समावेश होता.
कसोटीत केला पराक्रम-
कोहलीचे हे कसोटी क्रिकेटमधील २४वे शतक ठरले. याबरोबर त्याने कसोटीत भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी झेप घेतली. त्याने वीरेंद्र सेहवागला या यादीत मागे टाकले.
विराटचे कर्णधार म्हणुन हे कसोटीतील १७वे शतक ठरले. तसेच २०१८मधील त्याचे हे चौथे शतक आहे.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
५१- सचिन तेंडूलकर
३६ -राहुल द्रविड
३४- सुनिल गावसकर
२४- विराट कोहली
२३- वीरेद्र सेहवाग#म #मराठी #ViratKohli #INDvWI @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) October 5, 2018
सचिनचा विक्रम मोडला-
कसोटीत जलद २४ शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कोहलीने सचिनला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. त्याने सचिनने १२५ डावातील केलेल्या २४ शतकांचा विक्रम मोडत आता १२४ डावांत २४ शतके केली आहेत.
कसोटीत जलद २४ शतकं करणारे खेळाडू (डाव)
६६- डाॅन ब्रॅडमन
१२३- विराट कोहली
१२५- सचिन तेंडूलकर
१२८- सुनिल गावसकर#म #मराठी #ViratKohli #INDvWI @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) October 5, 2018
कर्णधार म्हणुनही पराक्रम-
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणुन सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. विराटने कसोटीत कर्णधार म्हणुन १७ शतके केली आहेत.
कसोटीत कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे खेळाडू
२५- ग्रॅम स्मिथ
१९- रिकी पाॅटिंग
१७- विराट कोहली#म #मराठी #ViratKohli #INDvWI @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) October 5, 2018
विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय शतके
कर्णधार असताना- १३४ डावात ३० शतके
कर्णधार नसताना- २५० डावात २९ शतके#म #मराठी #ViratKohli #INDvWI @MarathiBrain @MarathiRT @Mazi_Marathi @kridajagat— Sharad Bodage (@SharadBodage) October 5, 2018
Most International 100s
100- Sachin Tendulkar
71- Ricky Ponting
63- Kumar Sangarakara
62- Jack Kallis
59- Virat Kohli*
54- Hashim Amla
54- Mahela Jayawardene#INDvWI @Paytm #Rajkot #ViratKohli @imVkohli @TeamVirat @ViratGang @Virat_Official @ViratKohliFC— Sharad Bodage (@SharadBodage) October 5, 2018
All Hail the King ???? @imVkohli
24th Test ton ✅
17th as captain ????
4th century this year ????
2nd fastest to 24 Test ton ????
(More coming, we aren’t done yet) #TeamIndia #INDvWI pic.twitter.com/IgCw1K5JEk— BCCI (@BCCI) October 5, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-रिषभ पंत आणि षटकारांच नातं काही खास
–दुसऱ्या दिवशी काही मिनीटांतच कोहलीचा कसोटीत भीमपराक्रम
–विंडीज विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्याबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी
–वन-डे जबरदस्त गाजवणाऱ्या या खेळाडूला हवे आहे कसोटी संघात स्थान