भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतो. त्याचबरोबर तो नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतो. तो नेहमी त्याच्या मजेदार पोस्ट करत त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करतो. याच दरम्यान सेहवागने असे काही ट्विट केले आहे, ते पहिल्यानंतर सर्व चाहते आश्चर्यचकित झाले होते. सेहवागने ट्विटरवर चक्क फोननंबर शेअर केला आहे.
खरंतर, मंगळवारी(३ ऑगस्ट) वीरेंद्र सेहवागने लिहिले की, ‘माझा फोन शॉवरमध्ये पडला आहे आणि जोपर्यंत तो फोन ठीक होत नाही, तोपर्यंत तुम्ही माझ्याशी ९११२०८३३१९ या क्रमांकावर बोलू शकता.’ सेहवागचे हे ट्विट पाहून चाहते हैराण झाले आहेत.
लोकांनी या पोस्टवर काही क्षणातच कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. ही पोस्ट पाहून अनेकांनी तर्क लावायला सुरुवात केली की, सेहवागचे अकाऊंट हॅक झाले असावे.
इतकेच नाही तर अनेक चाहते सेहवागचा फोन नंबर डीकोड करत आहेत. काहींचा असा विश्वास आहे की, या संख्येत सेहवागला काहीतरी विशेष सांगयचे असावे. फोन नंबरच्या शेवटी ३१९ हे आकडे असून सेहवागची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम धावसंख्याही ३१९ आहे. त्याचवेळी, फोन नंबरच्या मध्यभागी ८३ देखील आहे, या धावा सेहवागने २००३ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात केल्या होता.
Dropped my phone in the shower, getting it fixed, call me on 9112083319
— Virender Sehwag (@virendersehwag) August 3, 2021
सेहवागचे हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनून राहिले आहे. लोकांना खात्री आहे की फक्त सेहवागच या ट्विटचे रहस्य चाहत्यांना लवकरच सांगेल. मजेशीर गोष्ट म्हणजे त्याने ही पोस्ट फेसबुक आणि ट्विटर दोन्हीवर शेअर केली आहे, त्यामुळे त्याचे अकाऊंट हॅक झाले असण्याची शक्यता कमी आहे.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांनी त्यानंबरवर कॉल करायला सुरुवात केली आणि लोक त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा टाकत आहेत. मात्र, सेहवाग सोबत बोलणं झालं असल्याचे कोणीही सांगितले नाही. सध्या सर्वजण सेहवागच्या पुढील पोस्टची वाट पाहत आहेत. कारण पुढचीच पोस्ट या रहस्याचा उलगडा करू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
वॉर्नरचे साऊथच्या गाण्यावर पुन्हा एकदा थिरकले पाय; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘हा’ भारतीय खेळाडू ठरू शकतो इंग्लंड दौऱ्यात ‘हुकुमी एक्का’, ऑसी दिग्गजाचा दावा