एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या तेराव्या हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. या हंगामात त्यांनी खेळलेल्या १० सामन्यांपैकी अर्ध्या सामन्यांतही विजय मिळवण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघाला टीकेचा सामना करावा लागत आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटर विरेंद्र सेहवागने पुन्हा एकदा चेन्नई संघावर निशाणा साधला आहे.
सेहवागची चेन्नई सुपर किंग्सवर टीका
सेहवाग सध्या आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या फेसबुक अकाउंवर एक विशेष कार्यक्रम करतो, ज्यात तो निर्भिडपणे आपले मत मांडत असतो. काही दिवसांपुर्वी राजस्थान रॉयल्सविरुद्ध चेन्नईचा ‘करा अथवा मरा’ सामना झाला होता. त्या सामन्यातही चेन्नईला विशेष कामगिरी करता आली नाही आणि राजस्थानने ७ विकेट्सने सामना खिशात घातला.
त्यानंतर सेहवागने चेन्नईवर टीका करत म्हटले की, “चेन्नई सुपर किंग्स हा जिंकणारा संघ नव्हे, तर एक वृद्ध कल्याण केंद्र आहे. या संघातून ड्वेन ब्रावो आधीच व्हीआरएस (Valuntry Retriement Scheme) घेऊन गेला आहे.” यापुर्वीही बऱ्याचदा सेहवागने चेन्नईवर निशाणा साधला आहे.
https://www.facebook.com/watch/?v=2853787841610147
प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी जिंकावे लागणार उर्वरित सामने
या हंगामात चेन्नईने एकूण १० सामने खेळले असून त्यातील केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर ७ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे गुणतालिकेत चेन्नई संघ शेवटच्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. आता उर्वरित चारही सामन्यात त्यांनी विजय मिळवला. तर त्यांच्यासाठी प्लेऑफचे दरवाजे उघडे होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या-
कपिल देव यांना हृद्यविकाराचा झटका; सचिनसह ‘या’ क्रिकेटर्सनी केली प्रार्थना
चेन्नई वि. मुंबई: दोन भावात आज होणार काट्याची टक्कर, लहानग्याने दिली मोठ्याला चेतावणी
ट्विटर वॉर!! धुव्वांदार विजयानंतर हैदराबादने राजस्थानला डिवचलं, ‘असा’ घेतला बिर्यानीचा बदला
ट्रेंडिंग लेख-
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’