भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने 2023 विश्वचषकातील उपांत्य फेरीपूर्वी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाला कोणतेही दडपण घेण्याची गरज नसल्याचे त्याने म्हटले आहे. वीरेंद्र सेहवागच्या मते, संघाला न घाबरता खुलेपणाने खेळण्याची गरज आहे.
विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 15 नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. संघातील बहुतांश खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. अशा परिस्थितीत भारतीय चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. घरचा संघ असल्याने मेन इन ब्लूवर काही दडपण असेल यात शंका नाही, परंतु लीग टप्प्यात भारतीय संघाचे खेळाडू ज्या प्रकारे खेळत होते त्यामुळे चाहते खूप उत्सुक आहेत. त्याचबरोबर उपांत्य फेरीत भारतीय संघाचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के करण्याच्या इराद्याने किवी संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे.
वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) याने माध्यमाशी बोलताना भारतीय संघाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, न घाबरता खेळा आणि तुमचे सर्वोत्तम द्या. निकालाचा विचार करू नका. 11 खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तर तुम्ही जिंकाल. जेव्हा आम्ही 2011च्या विश्वचषक सामन्यापूर्वी बोलत होतो तेव्हा प्रत्येकजण म्हणत होता की तुमचा सर्वोत्तम द्या. गॅरी कर्स्टननेही ड्रेसिंग रूममध्ये कोणतीही नकारात्मकता नसल्याची खात्री केली. ती गोष्ट आमच्या बाजूने गेली.
भारतीय संघाने साखळी फेरीत एकदा न्यूझीलंडचा पराभव केला आहे. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास अधिकच उंचावला आहे. चाहत्यांना एक उत्कृष्ट सामना बघायला मिळू शकतो. (Virender Sehwag Valuable Advice to Team India Said 11 players performed best)
म्हत्वाच्या बातम्या
विश्वचषक चालू असताना सनसनाटी बातमी! वॉर्नरने रिटायरमेंटविषयी दिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘मी…’
World Cup Semifinal: ‘रोहित न्यूझीलंडविरुद्ध ठरणार…’, माजी खेळाडूची भारतीय कर्णधाराबद्दल मोठी प्रतिक्रिया