जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा आता अंतिम टप्यात आला आहे. आज या (२३ जून) सामन्याचा राखीव दिवस आहे. त्यामुळे आज हे निश्चित होऊ शकते की, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिलावहिला विजेता कोण बनेल. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघ २१७ धावांवर गारद झाला होता. त्यानंतर न्यूझीलंड संघाने २४९ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली. यात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सनने मोलाचे योगदान दिले. परंतु त्याच्या अतिशय संथ खेळीमुळे त्याला ट्रोल केले जात आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही विलियम्सनवर निशाणा साधला आहे.
विलियम्सनने फलंदाजी करताना एका बाजूला विकेट जात असताना, संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने संथ आणि बचावात्मक फलंदाजी करत १७७ चेंडूत ४९ धावा केल्या. अखेर इशांत शर्माने त्याला विराट कोहलीच्या हातून झेलबाद केले. त्याच्या या खेळीचा संघाला फायदा झाला खरा परंतु या हळूवार खेळीमुळे त्याला अनेक चाहत्यांनी ट्रोल केले आहे. यात भारतीय दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागचा ही समावेश आहे. त्यानेही विलियम्सनच्या खेळीमुळे त्याची मजा घेतली आहे.
भारतीय दिग्गज सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्याने त्यात असे लिहले आहे कि, “विलियम्सन आज खेळपट्टीवर.” या व्हिडिओमध्ये एक कुत्रा शांत झोपला आहे. याच्या बॅकग्राउंडमध्ये ‘सोने दो सोने दो मुझ को नींद आ रही है सोने दो’ या बॉलिवूड गाण्याचा वापर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ त्याने केन विलियम्सनने धीम्या गतीच्या फलंदाजीशी जोडला आहे. चाहत्यांनी या व्हिडिओला खूप पसंतीही दिली आहे.
https://twitter.com/virendersehwag/status/1407311665075347458?s=20
दरम्यान पावसाने सामन्याच्या पाचव्या दिवशीच्या खेळाला सुरुवात होण्यास उशीर झाल्यामुळे २-२ तासांच्या तीन सत्रात ९१ षटके खेळण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडने १०१/२ च्या धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी, दुसर्या सत्रात न्यूझीलंड २४९ धावांवर बाद झाला आणि पहिल्या डावाच्या जोरावर ३२ धावांची आघाडी घेतली.
भारताकडून शमीने ४ आणि इशांत शर्माने ३ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाला नाही. फिरकी विभागात रवीचंद्रन अश्विनने ३ विकेट्स तर रवींद्र जडेजाने टीम साऊथीच्या रूपात न्यूझीलंड संघाचा शेवटचा विकेट घेतला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पाचव्या दिवसाखेर २ गडी गमावत ३२ धावांची आघाडी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या
काय भावा, पुजारा बनायचं आहे का?, सुपरस्लो फलंदाजीमुळे केन विलियम्सन झाला ट्रोल
ड्रेसिंग रुमबाहेर कोहली दिसताना काजू खाताना; नेटिझन्स म्हणाले, ‘आधी पोटोबा मग क्रिकेट सामना’
वॉनचा पुन्हा टीम इंडियाला टोमणा; म्हणे, ‘…तर न्यूझीलंड आतापर्यंत WTCचा विजेता असता,’