जेव्हा कधी क्रिकेटच्या मैदानात एखादा रोमांचक सामना खेळला जात असेल, तेव्हा मैदानातील प्रत्येक चाहत्याचे लक्ष खेळपट्टीकडे असते. स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ देखील सुरू असतो, अशात एखाद्या चाहत्याला शांती हवी असली, तरी ती मिळणे शक्य नाही. असे असले, तरी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात एक असा चाहता दिसला, ज्याला या गोंधळामुळे काहीच फरक पडत नाही. सामना सुरू असताना हा चाहता निवांत झोप घेत होता.
न्यूझीलंड संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभय संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना इंग्लंडने ५ विकेट्स जिंकला, जो ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला गेला होता. त्यानंतर आता मालिकेतील दुसरा कसोटी सामना नॉटिंघममध्ये खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी स्टॅड्समध्ये एक चाहता दिसला, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
सामना समोर सुरू असताना हा चाहता स्वतःच्या जागेवर निवांत झोप घेत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. क्रिकेटप्रेमी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. व्हिडिओत दिसणारा हा व्यक्ती काहीसा वयस्कर वाटत आहे. अनेकांनी त्याला रामायणातील कुंभकर्णाची उपमा दिली आहे. समालोचक देखील या चाहत्याला झोपलेला पाहून आश्चर्यचकित झाले. खेळपट्टीवरील फलंदाजाने विकेट गमावल्यानंतर त्याच्या आजूबाजूच्या सर्वांचा मोठ्याने आवाज आला आणि तो उठला. आजूबाजूला बसलेल्यांची रिऍक्शन पाहून हा चाहताच हैराण झाल्याचे पाहिले गेले.
Whatever you're paying this cameraman @SkyCricket
TRIPLE IT pic.twitter.com/nf0YGV9mf1
— Toby Tarrant (@tobytarrant) June 10, 2022
उभय संघातील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर इंग्लंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा पहिला डाव ५५३ धावांवर गुंडाळला गेला. त्यानंतर इंग्लंडने देखील पहिल्या डावात चांगली सुरुवात केली. १०० धावांचा टप्पा पार करेपर्यंत इंग्लंडच्या फक्त एका फलंदाजाने विकेट गमावली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘किलर’ मिलरचा काटा काढण्यासाठी द्रविड गुरू आखू शकतात ‘या’ ४ रणनीती, वाचा सविस्तर
दिनेश कार्तिक नव्हे तर ‘हा’ खेळाडू ठरेल भारतीय संघासाठी सर्वात मोठा गेमचेंजर, माजी कर्णधाराचा दावा