नवी दिल्ली। भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी खूप महत्त्वाचा ठरला आहे. पहिल्या मोसमात सीएसकेने धोनीला कर्णधार म्हणून आपल्या संघात सामील केले. तेव्हापासून धोनीने सीएसकेची धुरा सांभाळली आहे. त्याने संघबांधणीत कोणतीही कसर सोडली नाही. त्यामुळे सीएसके संघाला खतरनाक संघ मानले जाते, जो प्रत्येक हंगामात उपांत्य सामन्यात प्रवेश करतो. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन श्रीनिवासन यांनी नुकताच खुलासा केला की, धोनीने एका खेळाडूला तो संघाचा नाश करेल असे सांगून संघात घेतले नव्हते.
सीएसकेचे मालक श्रीनिवासन म्हणाले, “आम्ही धोनीला सल्ला दिला की तो एक चांगला खेळाडू होता. परंतु धोनीने म्हटले, ‘नाही सर, तो संघाचा नाश करेल. संघासाठी एकता महत्त्वाची आहे.” तरीही श्रीनिवासन यांनी तो खेळाडू कोण होता, हे सांगितले नाही.
ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या मुलाखतीत श्रीनिवासन म्हणाले, “धोनीने त्यांना म्हटले होते की तुम्ही अमेरिका पहा, तिथे फ्रंचायझी आधारित खेळ दीर्घकाळ चालतात. भारतातही याची सुरुवात झाली आहे. परंतु इंडियन सिमेंट्समध्ये आम्हाला ज्यूनियर लेव्हलवर संघाबरोबर काम करण्याचा अनुभव आहे.”
प्रतिभेवर आहे धोनीचा विश्वास
धोनी आणि श्रीनिवासन यांच्यात चांगले संबंध होते. ते म्हणाले की, “धोनीबद्दल जे काही म्हटले जाते, ते त्याच्या आकडेवारीवर आधारित असते.” ते पुढे म्हणाले, “टी२० संघात गोलंदाजी प्रशिक्षक असतात, ज्यांच्याविरुद्धही त्यांना गोलंदाजी करावी लागते. ते त्या सर्व फलंदाजांचे व्हिडिओ पाहतात. ते पाहतात की समोरच्या खेळाडूची ताकद काय आहे आणि कमजोरी काय आहे. परंतु धोनी यांमध्ये सामील नाही होत. तो केवळ प्रतिभेवर विश्वास ठेवतो.”
खेळाडूंना मैदानावर जज करतो धोनी
“गोलंदाजी प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग प्रत्येक वेळी तिथे उपस्थित असतात. प्रत्येक व्यक्ती आपापली मते देतो. परंतु धोनी यांमध्ये सामील होत नाही,” असेही श्रीनिवासन म्हणाले.
ते पुढे बोलताना म्हणाले, “धोनी खेळाडूंचे मैदानावरील प्रदर्शन पाहून त्यांना जज करतो. कारण इतर ठिकाणी त्यांच्या प्रदर्शनाची बरीच माहिती उपलब्ध असते. पण त्यानुसार त्या खेळाडूमधील गुणांची पारख करता येऊ शकत नाही.”
आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने सीएसकेला ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकून दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दुबईत आयपीएल पहायला जाणार क्रिकेटर्सचा परिवार? पहा बीसीसीआयने काय घेतला निर्णय
-डोंगराएवढे लक्ष आयर्लंडने पार करत इंग्लंडला चारली पराभवाची धुळ, २०११ विश्वचषकाची झाली आठवण
-यावेळी आयपीएलमध्ये चुकिला माफी नाही! ती एक चुक खेळाडूंना पडणार भलतीच महागात
ट्रेंडिंग लेख-
-५ असे क्रिकेटर, जे आयपीएल २०२० दरम्यान स्वत:ला फिनीशर म्हणून सिद्ध करायला उत्सुक
-धोनीच्या लाडक्या खेळाडूसह या ५ क्रिकेटर्सचं नशीब आयपीएलमध्ये राहिलं खराब
-आयपीएल २०२०- डेथ ओव्हर्समध्ये या ५ गोलंदाजांकडे असणार जगाचे लक्ष