पुणे । विनर अकादमी संघाने पीडीसीए संघाला तर, रिग्रीन संघाने आझम स्पोर्ट्स अकादमी संघाला पराभूत करताना आझम कॅम्पस मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत विनर अकादमी संघासमोर रिग्रीन संघाचे आव्हान राहणार आहे.
उपांत्य फेरीच्या पहिल्या लढतीमध्ये विनर अकादमी संघाने पीडीसीए संघाला ८ गडी राखून पराभूत केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पीडीसीए संघाचा डाव अपूर्वा भारद्वाज, वर्षा चौधरी व सारिका कोळी यांच्या भेदक गोलंदाजीने ८ षटकांत सर्वबाद २८ धावांत संपुष्टात आला.
पीडीसीए संघाकडून प्रतिभा अरगडेने सर्वाधिक १२ धावांची खेळी केली. अपूर्वा भारद्वाज, वर्षा चौधरी व सारिका कोळी यांनी प्रत्येकी २ तर, उत्कर्षा पवार व वैष्णवी काळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. २९ धावांचे आव्हान विनर अकादमी संघांने ३.५ षटकांत २ गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सई पुरंदरेने २० (४ चौकार) धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अपूर्वा भारद्वाजला सामनावीर म्हणून सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये रिग्रीन संघाने आझम स्पोर्ट्स अकादमी संघाला ६२ धावांनी पराभूत करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रियांका घोडकेच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर रिग्रीन संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २ बाद १७८ धावांपर्यंत मजल मारली. प्रियांका घोडकेने १३ चौकारांसह ९५ धावांची दमदार खेळी केली. तिला मुक्ता मगरे ३५ (३ चौकार), तेजल हसबनीस ४२ (२ चौकार) यांनी सुरेख साथ दिली.
रुचिता परदेशीने एक गडी केला. आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद ११६ धावा केल्या. किरण नवगिरे ४३ (५ चौकार), गौतमी नाईक ३६ (४ चौकार), सोनल पाटील १० यांनी चांगली खेळी केली. सायली अभ्यंकर, अदिती गायकवाड, तेजल हसबनीस, शिवानी भुकटे, नीलम पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रियांका घोडकेला सामनावीर घोषित करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : उपांत्य फेरी : पीडीसीए : ८ षटकांत सर्वबाद २८ (प्रतिभा अरगडे १२ (२ चौकार), अपूर्वा भारद्वाज २-१-३-२, सारिका कोळी २-१-३-२, वर्षा चौधरी २-०-१३-२, वैष्णवी काळे १-०-२-१, उत्कर्षा पवार १-०-७-१) पराभूत वि विनर अकादमी ३.५ षटकांत २ बाद २९. (सई पुरंदरे २० (४ चौकार), संजना शिंदे २-०-१३-१, रोहिणी माने १.५-०-१६-१).
रिग्रीन : २० षटकांत २ बाद १७८ (प्रियांका घोडके ९५ (१३ चौकार), तेजल हसबनीस ४२ (२ चौकार), मुक्ता मगरे ३५ (३ चौकार), रुचिता परदेशी २-०-१५-१) वि वि आझम स्पोर्ट्स अकादमी २० षटकांत ६ बाद ११६ (किरण नवगिरे ४३ (५ चौकार), गौतमी नाईक ३६ (४ चौकार), सोनल पाटील १०, नीलम पाटील १-०-६-१, तेजल हसबनीस ४-०-२०-१, सायली अभ्यंकर३-०-२४-१, शिवानी भुकटे २-०-१३-१, अदिती गायकवाड ४-०-२५-१).
क्रिकेटप्रेमीं आहात? आमचे हे रविवारचे भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार हे खास सदर नक्की वाचा-
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ७ – खेडेगावातील सुपरस्टार
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ६– विचित्र शैलीचा मोहंती
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ५– लढवय्या साईराज बहुतुले!
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ४– दैव देते, कर्म नेते!!
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ३– वन मॅच वंडर
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग २– एक स्कॉलर खेळाडू
–भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १– पाकिस्तानविरुद्धचा चौकार आणि कानिटकर
महत्त्वाच्या बातम्या-
–सिंधुला बॅडमिंटनमध्ये दुहेरीत जोडीदार म्हणुन हवा धोनी !
–२० वर्षाच्या रिषभ पंतने आज जे केले ते अनेकांना ११ आयपीएलमध्ये करता आले नाही
–साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी मुंबईकडून एक मोठा बदल
–टी२०मध्ये ५२८ चौकार आणि तेवढ्याच षटकारांची बरसात करणारा तो पहिलाच खेळाडू