आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी डबल हेडर पाहायला मिळणार आहे. दिवसातील दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या बलाढ्य संघांमध्ये आयोजित केला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन संघ भारत आणि पाकिस्तानंतर दुसरे सर्वात कट्टर प्रतिस्पर्धी मानले जातात. मात्र, विश्वचषक स्पर्धेच्या चालू हंगामात दोन्ही संघांसाठी परिस्थिती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांत्यात शनिवारी होणारा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयोजित केला गेला आहे. आयोजक आणि चाहत्यांना हा सामना निर्णायक आणि रोमांचक होण्याची अपेक्षा होती. मात्र, गुणतालिकेचा विचार करता इंग्लंड संघ उपांत्य सामन्याच्या स्पर्धेतून आधिच बाहेर पडला आहे. अशात केवळ ऑस्ट्रेलियन संघासाठी हा सामना अधिक महत्वाचा आहे. असे असले तरी, इंग्लंडसाठी देखील विजय मिळवणे महत्वाचे ठरणार. कारण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी विश्वचषकाच्या गुणतालिकेमधून संघ निवडले जाणार आहेत. अशात इंग्लंड संघ चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी आपले राहिलेले सामने जिंकण्याच्या प्रयत्नात असेल.
गुणतालिकेतील दोन्ही संघांचे स्थान
गुणतालिकेचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या सहा पैकी चार सामने जिंकले आहेत. गुणतालिकेत पॅट कमिन्स याच्या नेतृत्वातील संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण दुसरीकडे जोस बटलर याच्या नेतृत्वातील इंग्लंड संग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. इंग्लंडने विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी पाच सामन्यात पराभव स्वीकारला असून गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. अशात उपांत्य फेरीतून इंग्लंड बाहेर पडला असला, तरी ऑस्ट्रेलियासाठी पुढचा प्रत्येक सामना विजयात बदलणे गरजेचे आहे.
खेळपट्टीविषयी माहिती
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकूण 11 खेळपट्ट्या आहेत. यातील 5 खेळपट्ट्या काळ्या मातीपासून बनवल्या गेल्याय आहेत. पाच खेळपट्ट्या तीन प्रकारची माती एकत्र करून बनवल्या आहेत. तर एक खेळपट्टी दोन प्रकारची माती एकत्र करून बनवलेली आहे. यापूर्वीच्या सामन्यांचा विचार केला, तर अहमदाबादमध्ये फलंदाजीसाठी अनुकूल अनुकूल परिस्थिती पाहायला मिळाली आहे. अशात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यात देखील धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याठिकाणी घोलंदाजांना बाऊंस मिळतो, ज्याचा फायदा फलंदाज आणि वेगवान गोलंदाज दोघांनाही घेता येऊ शकतो. तसेच मधल्या षटकांमध्ये फिरकी गोलंदाजांनाही मदत मिळू शकते.
प्रथम फलंदाजी घ्यावी की गोलंदाजी?
आतापर्यंत याठिकाणी खेळल्या गेलेल्या 30 वनडे सामन्यांममध्ये 16 सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे. तर 14 सामन्यांमध्ये प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाले आहे. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 235, तर दुसऱ्या डावातील सरासरी 205 अशी राहिली आहे. अशात शनिवारी देखील नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणे योग्य ठरू शकते.
हवामान अंदाज –
हवामान अंदाजानुसार इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात पावसाची कुढलीच शक्यता वर्तवली गेली नाहीये. मात्र, अहमदाबादमध्ये दुपारी सुरू होणाऱ्या सामन्यात खेळाडूंना उन्हामुळे त्रास होऊ शकतो. तसेच सायंकाळच्या वेळी मैदानात दवाचे प्रमाण पाहायला मिळू शकते.
(England vs Australia Match Preview)
यातून निवडली जाणार प्लेइंग इलेव्हन –
इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोइन अली, गस एटकिंसन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियाम लिविंगस्टोन, डेविड मलान, आदिल राशिद, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेविड विली, मार्क वुड, क्रिस वोक्स.
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिंस (कर्णधार), स्टीव स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, सीन एबॉट, एश्टन एगर, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, डेविड वॉर्नर, एडम झॅम्पा, मिचेल स्टार्क.
महत्वाच्या बातम्या –
अफगाणी गोलंदाजांचे कमाल कमबॅक! गुणतालिकेतील पाचवा क्रमांक जवळपास निश्चित, कराव्या लागणार फक्त ‘इतक्या’ धावा
रोहितसेनेच्या कामगिरीने पाकिस्तानी दिग्गजाला भरली धडकी; स्वत:च म्हणाला, ‘इतका तगडा भारतीय संघ…’