भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्याला बुधवार पासून सुरुवात झाली. लंडनच्या ओव्हल मैदानावर होणाऱ्या या विजेतेपदाच्या सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट जगताच्या नजरा लागल्या आहेत. अशा स्थितीत या सामन्यात जे काही होईल, जे काही बोलले जाईल, त्याकडे सर्वांचे डोळे आणि कान लागलेले असतात. छोटीशी चूकही चाहत्यांच्या नजरेतून सुटणे कठीण असते. असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबत घडला, जिथे त्यांनी अशी चूक केली ज्यामुळे सर्वांनाच धक्का बसला.
हर्षा भोगलेंची एक आणि इंटरनेवर कमेंट्सचा पाऊस
गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटचा आवाज बनलेल्या हर्षा भोगलेने भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या अंतिम सामन्यावेळी कॉमेंट्री करताना भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफला इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन समजण्याची चूक केली. तर, त्याची ही चूक चाहत्यांनी पकडली आणि ही चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली. सध्या ही चूक इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
बुधवार, (7 जून) पासून सुरू झालेल्या अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवशी समालोचन करताना हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी दावा केला की, अँडरसन देखील ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला मदत करण्यासाठी पोहोचले होते. हर्षच्या म्हणण्यानुसार, अँडरसनने भारतीय संघाच्या गोलंदाजांना ओव्हल खेळपट्टीवर गोलंदाजी करण्याच्या पद्धतींचा सल्ला दिला. पण इथेच हर्षा भोगलची मोठी चूक झाली आणि सोशल मीडियावरील सतर्क दर्शकांनी ती आगेप्रमाणे पसरवली.
खरं तर, हर्षा भोगलेने ज्या व्यक्तीला जेम्स अँडरसन समजले तो भारतीय संघाचा ट्रेनर सोहम देसाई होता. भारतीय संघासोबत इंग्लंडला पोहोचणाऱ्या पहिल्या लोकांपैकी सोहम एक होता. यादरम्यान बीसीसीआयने संघाच्या खेळाडूंसोबत सोहम देसाईचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि काही चाहत्यांनी हर्षाची चूक लगेच सुधारली.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऍशेस मालिका खेळवली जाणार आहे. वर्षानुवर्षे क्रिकेटच्या मैदानात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यातील घनघोर वैर पाहून अँडरसन ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी भारताला मदत करत आहे असा हर्षा भोगले यांना विश्वास बसला असावा. असं सध्या चाहत्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहेत.
भारतीय गोलंदाजांची दमदार सुरुवात
बरं, भोगले बोलले ते काही खरं नव्हतं पण भारतीय गोलंदाज स्वत: खूप सक्षम आहेत आणि त्याचा परिणाम अंतिम सामन्याच्या पहिल्या सत्रात दिसून आला. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने चौथ्या षटकातच ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मोहम्मद सिराजला सलामीवीर उस्मान ख्वाजाची विकेट मिळाली. त्याचवेळी, लंचच्या आधी शार्दुल ठाकूरने डेव्हिड वॉर्नरला पव्हेलियन मध्ये माघीरी पाठवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : ड्रिंक्स ब्रेकदरम्यान कॅप्टन रोहितला ‘टिप्स’ देताना दिसला अश्विन, सर्वत्र रंगलीय फोटोची चर्चा
‘MPLमधील खेळाडू भविष्यात IPL आणि देशाच्या संघात चमकतील…’, लिलावानंतर रोहित पवारांचे लक्षवेधी ट्वीट