युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री समाजमाध्यमात नेहमी सक्रिय असतात. खासकरून धनश्री आपले डान्स व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांत पोस्ट करत असते. आणि त्यामुळे धनश्री सुद्धा चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे.
नुकताच युझवेंद्र चहलने आपली पत्नी धनश्रीसोबत व्यायाम करतानाच व्हिडिओ सध्या समाजमाध्यमात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओत चहल आणि त्याची पत्नी धनश्री व्यायाम करतांना एकमेकांची मदत करतांना दिसून येत आहेत. व्हिडिओ बघून चाहते आपल्या प्रतिक्रिया कळवत आहेत. तर काही हा व्हिडिओ बघून मजेदार कमेंट देखील करत आहे. एका वापरकर्त्याने चहलला पत्नीसोबत नव्हे तर ‘ग्रेट खली’ सोबत व्यायाम कर असा सल्ला दिला आहे. तर दुसऱ्या एकाने चहलला वजन वाढव, असाही सल्ला दिला आहे.
https://www.instagram.com/p/CP2StL2nuyA/?utm_source=ig_web_copy_link
इंग्लंड दौऱ्यावर चहलला डच्चू दिला गेला असून आता हा फिरकीपटू श्रीलंका विरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग होऊ शकतो. भारतीय संघाला श्रीलंका दौऱ्यावर प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि टी20 सामने खेळावयाचे आहेत. पहिला एकदिवसीय सामना 13 जुलैला होणार आहे. तर श्रीलंका दौऱ्याचा अंतिम सामना भारत 25 जुलैला खेळेल. लवकरच श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड निवड समिती करेल.
या आयपीएल हंगामात चहल आपल्या गोलंदाजीने काही खास कमाल दाखवू शकला नाही. परंतु स्थगित झालेली आयपीएल पुन्हा एकदा होणार आहे. आयपीएलचे उर्वरित 31 सामने युएईमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट बीसीसीआयने घेतला आहे. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून पुन्हा एकदा कमाल दाखवण्यासाठी चहल सज्ज होईल.
महत्वाच्या बातम्या:
आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ: पाकिस्तानच्या हसन अलीसह या खेळाडूंना मिळाले नामांकन
धोनीच्या फार्महाउसची करा घरबसल्या सैर, पत्नी साक्षीने शेअर केले फोटो
धवन-द्रविडची जोडी करणार लंकादहन, असा असेल उर्वरित संघ