सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत आक्रमक फलंदाजी करत तामिळनाडू संघाला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या शाहरुख खान याला पंजाब किंग्सने ५ कोटी २५ लाखांची बोली लावत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले आहे. शाहरुख खान याची मूळ किंमत २० लाख रुपये होती. शाहरुख खानला आपल्या संघात समाविष्ट करून घेण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये स्पर्धा रंगली होती. दोन्ही संघ बरोबरीची बोली लावत होते. शेवटी पंजाब किंग्सने ही स्पर्धा जिंकली आणि शाहरुख खानला आपल्या संघात समाविष्ट करून घेतले.
याच शाहरुख खानच्या आयुष्यातील अशा काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुम्ही जाणून घेणे आवश्यक आहे.
चला तर मंडळी, वाचूयात शाहरुख खानच्या आयुष्यातील १० गोष्टी-
– शाहरुख खान याचा जन्म २७ मे १९९५ रोजी चेन्नईमध्ये झाला होता.
– बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानच्या नावावरून त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे नाव शाहरुख असे ठेवले होते.
– शाहरुखने अगदी छोट्या वयापासूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तो डॉन बॉस्को शाळेसाठी क्रिकेट खेळत असे.
– वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्याने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या लीग स्पर्धेत पदार्पण केले होते.
– आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या या फलंदाजाने २०१३-१४ च्या विजय हजारे ट्रॉफीत तामिळनाडू संघासाठी पदार्पण केले. त्यांनतर २०१८-१९ मध्ये त्याने रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये पदार्पण केले
– २०१२ मध्ये झालेल्या ज्युनियर चेन्नई सुपर किंग्स टुर्नामेंटमध्ये त्याला ‘प्लेयर ऑफ द टुर्नामेंट’चा पुरस्कार मिळाला होता.
– शाहरुख हा उजव्या हाताचा फलंदाज आहे. तसेच तो ऑफ-ब्रेक गोलंदाजी देखील करतो.
– २०१४ साली त्याने देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये गोवा संघाविरूद्ध पदार्पण केले होते.
– सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे त्याची सर्वत्रच चर्चा झाली. शाहरुख खानने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेत तामिळनाडू संघाकडून खेळत असताना हिमाचल प्रदेश संघाविरुद्ध अवघ्या १९ चेंडूत ४९ धावांची खेळी केली होती. तसेच अंतिम फेरीत बडोदा संघाविरुद्ध खेळताना ७ चेंडूत १८ धावा करत तामिळनाडू संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
टेम्पो चालकाचा मुलगा ते नेट बॉलर अन् आता आयपीएल गाजवण्यास सज्ज, पाहा कोण आहे तो?
बॉलिवूडचा ‘किंग खान’च्या नावावर आपले नाव ठेवणारा शाहरुख बनला कोट्याधीश, वाचा त्याची रोमांचक कहाणी
दुर्दैवच म्हणायचं अजून काय! ५ स्टार क्रिकेटपटू, ज्यांना लिलावात कुणीही मिळाला नाही खरेदीदार