ऑस्टेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हाॅजने आपल्या आयपीएल ड्रीम ११मध्ये चौथ्या क्रमांकावर रिषभ पंतची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचीच निवड केली आहे.
त्याने आपल्या संघातही केवळ ४ परदेशी खेळाडूंनाच संधी दिली आहे.
त्याने सलामीला डेविड वाॅर्नर व रोहित शर्मा या स्फोटक फलंदाजांना संधी दिली आहे. या दोघांनीही आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे.
अपेक्षेप्रमाणे तिसऱ्या स्थानी भारतीय संघाचा कर्णधार व आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला त्याने संधी दिली आहे. गेले काही आयपीएल हंगाम गाजविणाऱ्या रिषभ पंतला त्याने चौथ्या स्थानी स्थान दिले आहे.
ज्या खेळाडूशिवाय आयपीएल ड्रीम ११ तयारच होऊ शकत नाही त्या एबी डिविलियर्सला त्याने पाचव्या तर कॅप्टन कूल एम धोनीला सहाव्या स्थानी संधी दिली आहे.
फिरकीपटूंमध्ये त्याने सुनिल नारायण व राशिद खान या खेळाडूंना संधी दिली आहे तर वेगवान गोलंदाजांत मुनाफ पटेलचा समावेश करुन सर्वांना धक्का दिला आहे.
दहाव्या व अकराव्या जागेसाठी भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांना त्याने संधी दिली आहे.
ब्रॅड हाॅगची आयपीएल ड्रीम ११- रोहित शर्मा, डेविड वाॅर्नर (परदेशी खेळाडू), विराट कोहली, रिषभ पंत, एबी डिविलियर्स (परदेशी खेळाडू), एमएस धोनी, सुनिल नारायण (परदेशी खेळाडू), राशिद खान (परदेशी खेळाडू), मुनाफ पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह